अनुदान नावालाच, हा तर भामट्यांचा डाव, वृद्ध महिलेसोबत असं घडलं, छ. संभाजीनगरात खळबळ
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजी विक्रेत्या वृद्ध महिलेची अनुदानाच्या नावाने फसवणूक केली. साडेतीन तोळे सोने अन् रोख रक्कम लंपास केली.
छत्रपती संभाजीनगर : अनुदानाच्या नावाखाली वयोवृद्ध महिलेला फसविल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. दोन भामट्यांनी 60 वर्षीय भाजी विक्रेती गयाबाई कडुबा वेताळ यांना लक्ष्य करत त्यांच्या हातातील साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि 7 हजार रुपये असा ऐवज लुबाडला. गयाबाई बुधवारी (26 नोव्हेंबर) सकाळी पोस्ट ऑफिसमधील काम आटोपून घराकडे पायी जात असताना चिकलठाणा परिसरातील मिनी घाटीजवळ ही घटना घडली.
रस्त्यात थांबवून दोघा अनोळखी तरुणांनी गयाबाई वेताळ यांना एका बनावट अनुदान योजनेबाबत माहिती देत “वृद्धांसाठी विशेष सहाय्य चालू आहे” असे सांगत विश्वासात घेतले. यानंतर आरोपींनी मोठा डाव रचत, “एका व्यक्तीला मुलगा झाल्यामुळे तो आनंद म्हणून गरीबांना पैसे देत आहे” अशी खोटी गोष्ट सांगितली.
advertisement
विश्वास वाढवण्यासाठी त्यांनी गयाबाईंना मिनी घाटी गेटजवळील एका झाडाखाली नेले. इथे पोहोचल्यावर दुसऱ्या भामट्याने अनुदान मिळवण्यासाठी दागिने अंगावर नसणे आवश्यक असल्याचे बनाव रचत गयाबाईंना आपले 18 ग्रॅमचे मंगळसूत्र, 12 ग्रॅमचे झुंबर आणि 4 ग्रॅम अंगठी काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले. भोळ्या स्वभावाच्या गयाबाईंनी सांगितल्याप्रमाणे दागिने तसेच जवळ असलेली सात हजारांची रोख रक्कम पिशवीत ठेवली.
advertisement
गयाबाईंनी पिशवी बांधून घेताच आरोपीने पिशवी हातात घेऊन पळ काढला. त्यांना हे समजण्याआधीच दोघे गायब झाले होते. दागिन्यांचा आणि पैशांचा झालेला नुकसानीचा अंदाज येताच त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. वृद्धांना लक्ष्य करून अनुदान, योजना किंवा लाभाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे या प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.
advertisement
कशी केली फसवणूक?
दागिने ठेवलेली पिशवी आरोपींनी दुसऱ्या एका पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने घेतली. काही वेळाने त्यांनी गयाबाईंच्या हातात दुसरी पिशवी देऊन त्या दोघांनी धूम ठोकली. घरी जाऊन गयाबाईंनी पिशवी उघडून पाहिले असता, दागिन्यांची आणि पैशांची मूळ पिशवी त्यात नव्हती. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि पोलिसांत धाव घेतली, याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Nov 28, 2025 12:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
अनुदान नावालाच, हा तर भामट्यांचा डाव, वृद्ध महिलेसोबत असं घडलं, छ. संभाजीनगरात खळबळ









