दिवाळीत जरा सावधान! छ. संभाजीनगरात FDA ची मोठी कारवाई, भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: दिवाळीपूर्वी वाढलेल्या मागणीचा गैरफायदा घेत, काही व्यापाऱ्यांकडून दर्जाहीन तुपाची विक्री केली जात असून एफडीएने कारवाई केलीये.
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा सण जवळ आल्याने बाजारात तुपाची मागणी वाढली आहे. अशातच अन्न व औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी धडक कारवाई केली. दोन ठिकाणी संशयास्पद तुपावर छापे टाकत मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे तूप जप्त करण्यात आले आहे. दिवाळीपूर्वी वाढलेल्या मागणीचा गैरफायदा घेत, काही व्यापाऱ्यांकडून दर्जाहीन तुपाची विक्री केली जात आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सातारा परिसरातील संस्कृती गृहोद्योग येथे पहिली कारवाई ही अन्न सुरक्षा अधिकारी एस. टी. जाधवर यांनी केली. या ठिकाणी दोन ब्रँडचे तूप जप्त करण्यात आले. एका ब्रँडचे 500 मिली क्षमतेचे 14 जार किंमत रुपये 4,760 रुपये, तसेच दुसऱ्या ब्रँडचे रुपये 62,400 किमतीचे तूप असा एकूण रुपये 67,160 किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
advertisement
दुसरी कारवाई ही शहरातील जुन्या मोंढ्यातील पी.अँड एच. फूड्सवर करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. टी. रोडे यांनी ही कारवाई केली. तपासादरम्यान 500 मिलीचे 428 जार किंमत रुपये 1,54,936 आणि 200 मिलीचे 526 जार किंमत रुपये 90,593 असे मिळून रुपये 2 लाख 45 हजार 528 किमतीचे तूप जप्त करण्यात आले.
advertisement
या दोन्ही कारवाई मधून तब्बल 3 लाखांहून अधिक रुपयांचे तूप एफडीएने जप्त केले. दिवाळीत तुपाची मागणी बरीच वाढते. त्यामुळे भेसळीचे प्रमाणही वाढलेले असते. या भेसळयुक्त तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांनी योग्य ती तपासणी करून तूप, खवा यासारख्या गोष्टी खरेदी कराव्यात जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही, असं सांगण्यात आलेलं आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 12, 2025 10:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
दिवाळीत जरा सावधान! छ. संभाजीनगरात FDA ची मोठी कारवाई, भेसळयुक्त तुपाचा साठा जप्त