advertisement

आईनं नाकारलं, चिमुकल्यानं मृत्यूला हरवलं, पण..., छ. संभाजीनगरची मन हेलावणारी घटना

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: बाळ स्पेशल चाइल्ड असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्याच्यावर 3 महिने उपचार करण्यात आले.

आईनं नाकारलं, चिमुकल्यानं मृत्यूला हरवलं, पण..., छ. संभाजीनगरची मन हेलावणारी घटना
आईनं नाकारलं, चिमुकल्यानं मृत्यूला हरवलं, पण..., छ. संभाजीनगरची मन हेलावणारी घटना
छत्रपती संभाजीनगर: आई आणि बाळाचं नातं जगातील सर्वात पवित्र, अतूट आणि निस्वार्थ मानलं जातं. पोटच्या गोळ्याला आई अगदी मरेपर्यंत जपते. परंतु, परभणीतील एका रुग्णालयात घडलेली घटना मन हेलावणारी आहे. एका स्त्री रुग्णालयात एक महिला घाबरलेल्या आणि अगतिक अवस्थेत आली. तिच्या कुशीत अवघ्या एक दिवसाचा कोवळा जीव होता. बाळाची मृत्यूशी झुंज सुरू असल्याने रुग्णालयाने क्षणाचाही विलंब न करता दोघांवर उपचार केले. मात्र, 2-3 दिवसांतच आई पोटच्या गोळ्याला सोडून पळाली.
आई परागंदा झाल्यामुळे बाळ एकटंच होतं. डॉक्टर राउंडला आल्यावर ही बाब लक्षात आली. रुग्णालयाच्या स्टाफने आईचा सर्वत्र शोध घेतला. पण ती निष्ठुर आई बाळाला सोडून निघून गेली होती. रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना पाचारण केले. कोतवाली पोलीस ठाण्यात आईविरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र पोलिसांनी शोध घेऊन देखील आई सापडली नाही.
advertisement
बाळाची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि जणू मृत्यूशी झुंज सुरू होती. बाळ स्पेशल चाइल्ड असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्याच्यावर 3 महिने उपचार करण्यात आले. जन्मापासून संघर्ष सुरू झाला असताना हे बाळ त्यातून सावरले. त्यानंतर या विशेष बाळाला छत्रपती संभाजीनगरच्या ‘साकार’ संस्थेत दाखल करण्यात आले.
साकारमध्ये जीवनाला आकार
गेल्या काही काळापासून हा आई-वडिलांविना पोरका जीव ‘साकार’मध्ये मोठा होत आहे. तो उपचारांना देखील चांगला प्रतिसाद देत असून घरगुती वातावरणात त्याची प्रकृती वेगाने सुधारली. आता बाळ अगदी खुलून दिसत आहे. त्याला संस्थेच्या रूपाने कुटुंब मिळाले असून इकडे त्याचे ‘कवीश’ असं नामकरण देखील करण्यात आले आहे.
advertisement
दत्तक प्रक्रियेसाठी उपलब्ध होणार
दरम्यान, या बालकाच्या पालकांचा शोध सुरू आहे. त्यांनी देखील पुढील 30 दिवसांच्या आत बालकल्याण समिती, छत्रपती संभाजीनगरची साकार संस्था आणि 1098 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा. अन्यथा बाळाला दत्तक प्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. जेणेकरून त्याला त्याचे हक्काचे घर आणि कुटुंब मिळू शकेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आईनं नाकारलं, चिमुकल्यानं मृत्यूला हरवलं, पण..., छ. संभाजीनगरची मन हेलावणारी घटना
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement