advertisement

भिवंडी हादरली! जिन्यात दबा धरून बसला होता नराधम; 10 वर्षांच्या मुलीसोबत केलं संतापजनक कृत्य

Last Updated:

Bhiwandi Crime News : भिवंडीतून एका चिमुकली पायऱ्यावरुन खाली जात असताना असं काही घडतं त्याने संपूर्ण शहर हादरुन गेलं आहे. नक्की काय घडलं आहे आणि कधी घडले याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

News18
News18
भिवंडी : प्रत्येक पालक हे आपल्या लहान मुलांना एकटं सोडणं बऱ्याचदा टाळतात. मात्र कधी कधी असं होतं की मुलं घराजवळ असलेल्या परिसरात एकटी जातात. भिवंडीत अशाच एका 10 वर्षीय चिमुकलीसोबत फक्त पायऱ्यांवरून उतरताना घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे.
नक्की काय घडले?
advertisement
भिवंडी शहरात एका लहान मुलीसोबत अत्यंत संतापजनक प्रकार घडलेला आहे. 10 वर्षांची चिमुरडी घरातून खालीत येत असताना हा विनयभंग केल्याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी एका 31 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
जिन्यात दबा धरून बसला होता नराधम
मिळालेल्या माहितीनुसार,पीडित मुलगी ही सोमवारी संध्याकाळच्या वेळी इमारतीच्या जिन्यावरुन खाली येत होती. याच दरम्यान आरोपी शाहरुख आयुब खान याने मुलीला गाठले आणि अश्लील चाळे करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या धक्कादायक प्रकारानंतर अख्या शहरात संताप व्यक्त होत आहे.
advertisement
घडलेल्या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनीही तातडीने या घटनेचे गांभीर्य ओळखून शाहरुखला अटक केली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून अशा वाढत्या घटनांमुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
भिवंडी हादरली! जिन्यात दबा धरून बसला होता नराधम; 10 वर्षांच्या मुलीसोबत केलं संतापजनक कृत्य
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement