नशेत मित्रानेच केला मित्राचा खून, छ. संभाजीनगर हादरलं

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केली आहे.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर, अविनाश कानडजे, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगमधून मोठी बातमी समोर येत आहे. नशेत असलेल्या मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.  छत्रपती संभाजीनगरच्या विश्रांतीनगरमध्ये ही घटना घडली आहे. अमोल उर्फ नंदू दाभाडे असं मृत तरुणाचं नाव आहे, तर निलेश चव्हाण असं आरोपीचं नाव आहे. विशेष म्हणजे गेल्या सात दिवसांमधील ही तीसरी हत्या आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरात विश्रांतीनगर भागात जुन्या वादातून बेधुंद नशेत असणाऱ्या गुन्हेगाराने मित्राचीच छातीत चाकू खुपसून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमोल उर्फ नंदू दाभाडे असं मृत तरुणाचं नाव आहे तर निलेश चव्हाण असं या मारेकर्‍याचं नाव आहे.
विशेष म्हणजे एकाच वेळी 8 नशेच्या गोळ्या आणि गांजा पिऊन आरोपीने  एकाच घावात आपल्या मित्राची हत्या केली. गेल्या सात दिवसांमध्ये ही हत्येची तिसरी घटना आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
नशेत मित्रानेच केला मित्राचा खून, छ. संभाजीनगर हादरलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement