Ganeshotsav 2025: 32 वर्षांपासून जपलाय छंद, घरीच केल्या गणपती बाप्पांच्या 1000 हून अधिक मूर्ती संग्रहित, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या मूर्ती या गोळा केलेल्या आहेत. त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या बाप्पांच्या मूर्ती या संग्रहित आहेत.
छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक व्यक्तीला कुठला ना कुठला छंद जोपासायला आवडत असतो. असा छंद छत्रपती संभाजीनगर शहरातील माजी न्यायाधीश यांना देखील आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक अशा गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या मूर्ती या गोळा केलेल्या आहेत. त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या बाप्पांच्या मूर्ती या संग्रहित आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील मिटमिटा परिसरात राहणाऱ्या निवृत्त न्या. चारुलता पटेल या राहतात. सध्या त्यांच्या कुटुंबात त्या स्वतः एकट्याच आहेत. त्यामुळे त्या संभाजीनगर शहरातील त्यांचा संपूर्ण शिक्षण देखील शहरामध्येच पूर्ण झाले. फक्त त्या बाहेरगावी होत्या. आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबामध्ये फक्त त्या स्वतः एकट्याच आहेत. फक्त बाप्पाच्या मूर्तींचा संग्रह आहे. त्यांनी 32 वर्षांमध्ये देशातील विविध मंदिरांमधून दीड ते दोन फुटांच्या आतील तब्बल 1000 हून अधिक गणपती मूर्तींचा संग्रह केला आहे. या 1000 हून अधिक मूर्तींमध्ये गणपतीच्या विविध रूपांमध्ये सुंदर अशा मूर्तींचा समावेश आहे.
advertisement
त्यांना लहानपणापासूनच गणपती बाप्पांची आवड होती. त्यामुळे नोकरी करत असताना देखील त्या सुट्ट्यांमध्ये विविध मंदिरांना भेटी देण्यासाठी जात होत्या. ज्यामध्ये भारतातील विविध राज्यांमध्ये असलेल्या गणपती मंदिरांना त्यांनी भेटी दिल्या. भेटी दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या गणेश मूर्ती एकत्र करण्याचा छंद जोपासला. ज्यामध्ये दीड ते दोन फुटांच्या आत असलेल्या लहान लहान सुंदर अशा वेगवेगळ्या मूर्ती त्यांनी एकत्र केल्या. तसं त्यांच्याकडे गणपती बाप्पाचे अनेक असे फोटो देखील आहेत. त्यासोबतच थर्माकोलपासून तयार केलेल्या देखील काही बाप्पाच्या मूर्ती त्यांच्याकडे आहेत.
advertisement
भविष्यात मला माझ्याकडे जेवढ्या पण मूर्ती आहेत, त्यांचे सर्व संग्रहालय तयार करायचे आहे. हे संग्रहालय मला सर्वांसाठी खुले करायचे आहे अशी माझी इच्छा आहे. त्यामुळेच मी माझ्या घराला दुर्वांकुर असे नाव देखील दिलेले आहे. मला या माझ्या मूर्तिसंग्रहात अजून देखील मूर्ती या संग्रहित करायच्या आहेत, असं चारुलता पटेल यांनी सांगितले आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
September 02, 2025 7:07 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Ganeshotsav 2025: 32 वर्षांपासून जपलाय छंद, घरीच केल्या गणपती बाप्पांच्या 1000 हून अधिक मूर्ती संग्रहित, Video