advertisement

महिनाभराचं ‘वेटिंग’ असलेल्या ट्रेनमध्ये अचानक रिकामे राहू लागले सीट; नांदेड-पुणे ट्रेनबाबत नेमकं काय घडलं?

Last Updated:

Railway Update: नांदेड-पुणे एक्स्प्रेसला तर महिनाभराचं ‘वेटिंग’ असायचं. मात्र, आता गाडी पुण्याऐवजी हडपसरपर्यंत धावत आहे.

Kumbh Mela 2026: कुंभमेळ्याला जा अन् दुहेरी फायदा मिळवा, पुणे विद्यापीठाची विद्यार्थ्यांसाठी खास योजना, पाहा सविस्तर
Kumbh Mela 2026: कुंभमेळ्याला जा अन् दुहेरी फायदा मिळवा, पुणे विद्यापीठाची विद्यार्थ्यांसाठी खास योजना, पाहा सविस्तर
‎छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातून पुण्याकडे शिक्षण, नोकरी आणि कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुण्याकडे येणारे बहुतांश लोक हे स्वस्तातल्या प्रवासासाठी रेल्वेलाच पसंती देतात. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांना नेहमीच गर्दी असते. विशेषत: नांदेड-पुणे एक्स्प्रेसला तर महिनाभराचं ‘वेटिंग’ असायचं. मात्र, आता गाडी पुण्याऐवजी हडपसरपर्यंत धावत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्याचा थेट परिणाम रेल्वेच्या तिकिटांवर देखील झाल्याचं दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातून अहिल्यानगरमार्गे पुण्याकडे रस्त्याने प्रवास करताना खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे गेल्या काही काळात पुण्याला जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जात होते. नांदेड–पुणे एक्स्प्रेसला महिनाभर आधीच ‘वेटिंग’ लागत असे. मात्र, हीच गाडी आता पुण्याऐवजी हडपसरपर्यंतच धावत असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी होताना दिसत आहे.
advertisement
‎ही रेल्वे 26 जानेवारीपासून पुण्याऐवजी हडपसरपर्यंत धावू लागली. यापूर्वी या गाडीचे तिकीट मिळवणे कठीण मानले जात होते. मात्र सध्या परिस्थिती बदलली असून तृतीय श्रेणीत दैनंदिन करंट बुकिंगमध्येही तिकीटे उपलब्ध राहत आहेत. 4 फेब्रुवारी रोजी तर करंट बुकिंगमध्ये तब्बल 50 तिकीटे शिल्लक असल्याचे दिसून आले.
‎प्रवाशांचा हाच कमी प्रतिसाद पुढेही कायम राहिल्यास रेल्वेला आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागू शकतो. संबंधित रेल्वे पुन्हा पुण्यापर्यंत वाढवावी किंवा तिच्या फेऱ्यांमध्ये कपात करावी लागू शकते, असे मत रेल्वे अभ्यासक व्यक्त करत आहेत.
advertisement
हडपसर नव्हे खडकीपर्यंत असावी गाडी
‎नांदेड–हडपसर एक्स्प्रेस किमान खडकी स्थानकापर्यंत (जे पुणे स्टेशनपासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आहे) वाढवण्यात यावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे. खडकीपर्यंत गाडी गेल्यास विद्यार्थी, नोकरदार आणि उपचारासाठी प्रवास करणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो. तसेच पिंपरी-चिंचवड भागातील प्रवाशांसाठी अंतरही कमी होऊ शकते, असे प्रवाशांचे मत आहे.
advertisement
दरम्यान, खडकीनंतर पुणे स्टेशनवर गाडी पोहोचल्यानंतर कोथरूड, कर्वेनगर, शिवाजीनगर तसेच पेठेतील प्रवाशांनाही त्याचा फायदा होईल, असे रेल्वे प्रवासी महासंघाचे सदस्य दयानंद दीक्षित यांनी नमूद केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
महिनाभराचं ‘वेटिंग’ असलेल्या ट्रेनमध्ये अचानक रिकामे राहू लागले सीट; नांदेड-पुणे ट्रेनबाबत नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement