नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी! ऐन सणासुदीच्या काळात वाढले रवा, मैदा, गव्हाचे भाव, व्यापाऱ्यांनी सांगितलं कारण, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
chhatrapati sambhaji nagar news : सध्या बाजारात गहू, मैदा, रवा, गव्हाच्या पिठाचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तर ही नेमकी किती भाववाढ झाली आहे तसेच नेमकी कशामुळे ही भाववाढ झाली आहे, याचबाबत आपण जाणून घेऊयात.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : सर्वत्र नवरात्रोसत्सवाचा उत्साह दिसत यानंतर आता दसरा, दिवाळी या सणाचीही लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, याच आता सणासुदीच्या काळात नागरिकांचा आर्थिक भार वाढवणारी बातमी समोर आली आहे. सध्या बाजारात गहू, मैदा, रवा, गव्हाच्या पिठाचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तर ही नेमकी किती भाववाढ झाली आहे तसेच नेमकी कशामुळे ही भाववाढ झाली आहे, याचबाबत आपण जाणून घेऊयात.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील व्यापारी निलेश सोमाणी यांनी याच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, आता दसरा, दिवाळी हे सण एकापाठोपाठ येणार आहेत. तर यामुळे सध्या गहू, मैदा, रवा आणि रेडीमेड गव्हाच्या पिठाचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सध्याला या सर्व वस्तूंना सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि त्यामुळेच ही भाव वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
यामध्ये सध्या 100 ते 150 रुपयांनी या सगळ्यात ही भाववाढ झाली आहे. मिलर्सनी सध्या सरकारकडे जास्त कोटा वाढवून देण्याची मागणी ही केलेली आहे. जर सरकारने कोटा वाढून दिला तर भाव हे स्थिर राहण्याची शक्यता आहे. तसेच जर नाही वाढून दिला तर हे भाव जास्त वाढण्याची देखील शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
advertisement
सध्या किरकोळ बाजारात गव्हाची 36 ते 40 रुपये किलोने विक्री होत आहे. तर गव्हाच्या पिठाची 42 रुपये किलोने विक्री होत आहे. तसेच सध्या मैदा 39 ते 40 रुपये किलोने विक्रला जात आहे. रव्याचे भाव हे 41 ते 42 रुपये प्रतिकिलो आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे जे भाव आहेत हे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 10, 2024 11:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी! ऐन सणासुदीच्या काळात वाढले रवा, मैदा, गव्हाचे भाव, व्यापाऱ्यांनी सांगितलं कारण, VIDEO

