Sambhajinagar Crime : 18 सीसीटीव्ही फुटेज तपासले पण काहीच हाती लागेना, अखेर पोलिसांनी हेअरस्टाईलवरून पकडला आरोपी, कसं? पाहा
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sambhajinagar Crime News : सीसीटीव्ही फुटेजच्या बारकाईने केलेल्या तपासणीदरम्यान, एका युवकाची इतर सामान्य लोकांपेक्षा वेगळी हेअरस्टाइल पोलिसांच्या नजरेत भरली.
Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी नुकताच एका चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी वापरलेली शक्कल चर्चेचा विषय ठरली आहे. अत्यंत वेगळ्या पद्धतीने तपास करत पोलिसांनी केवळ आरोपीच्या हेअरस्टाइलवरून त्याची ओळख पटवली आणि त्याला बेड्या ठोकल्या. शहरातील गारखेडा परिसरातील मोहटादेवी मंदिराजवळ 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती.
या वेळी सुमन निकम यांच्या गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या तीन व्यक्तींनी हिसकावून पळ काढला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी परिसरातील तब्बल 18 सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या बारकाईने केलेल्या तपासणीदरम्यान, एका युवकाची इतर सामान्य लोकांपेक्षा वेगळी हेअरस्टाइल पोलिसांच्या नजरेत भरली.
18 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं. पण फुटेज नीट पाहिल्यावर आरोपी कोण असू शकतो, याची खात्री पोलिसांना पटली. पोलिसांनी हेअरस्टाइलवरून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
advertisement
पोलिसांनी या विशिष्ट हेअरस्टाइलवरून तपास अधिक केंद्रित केला आणि ती हेअरस्टाइल शुभम राठोड याची असल्याचे त्यांना ओळखता आले. तत्काळ पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. कठोर चौकशीनंतर, शुभमने अखेर या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या साथीदारासह त्याला अटक केली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी चोरीला गेलेले सोन्याचे 12 मणी, कानातील कुड्या आणि एक मोबाइल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
view commentsLocation :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
November 18, 2025 8:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sambhajinagar Crime : 18 सीसीटीव्ही फुटेज तपासले पण काहीच हाती लागेना, अखेर पोलिसांनी हेअरस्टाईलवरून पकडला आरोपी, कसं? पाहा


