'अभिमन्यू धर्माच्या बाजूने होते तर आधुनिक...', दानवेंच्या निशाण्यावर पुन्हा फडणवीस
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ गोदाम प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आमचं वैयक्तिक दुःख काही नाही, मात्र राज्याची जनता दुःखी असल्याने आम्ही दुःखी आहोत. सत्ता बदल होणार यात काही शंका नाही गणपती त्यावर शिक्कामोर्तब करतील असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले दानवे?
'आमचं वैयक्तिक दुःख काही नाही, मात्र राज्याची जनता दुःखी असल्याने आम्ही दुःखी आहोत. सत्ता बदल होणार यात काही शंका नाही गणपती त्यावर शिक्कामोर्तब करतील. आधुनिक अभिमन्यू म्हणून फडणवीस कुठेच बसत नाहीत, फडणवीस चक्रव्यूहमध्ये अडकले नाहीत तर ते स्वतः त्यात गेले आहेत. अभिमन्यू धर्माच्या बाजूने होते, आधुनिक अभिमन्यू अधर्मी आहेत, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी फडणवीसांवर केला आहे.
advertisement
'दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर देखील निशाणा साधला. मराठा आरक्षणबाबत जे सत्तेत आहेत त्यांनीच ओबीसी आरक्षणाबाबत लिहून द्यावे. आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत.आता ते सत्तेत आहेत, म्हणून त्यांनी आधी जरांगे यांना लिहून द्यावे. मुख्यमंत्री यांनी जाहीर करावे किती लोकांना रोजगार मिळाला, एखादे ऍग्रिमेंट झाले म्हणजे उद्योग मिळाले असं होत नाही. सरकार फक्त घोषणा गोलमोल करण्यासाठी करते' असं दानवे यांनी म्हटलं आहे.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
September 07, 2024 1:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
'अभिमन्यू धर्माच्या बाजूने होते तर आधुनिक...', दानवेंच्या निशाण्यावर पुन्हा फडणवीस