Maharashtra politics : '...तर एक्झिट पोल खोटे ठरणार, इंडिया आघाडीला इतक्या जागा मिळतील'; दानवेंनी आकडाच सांगितला
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
एक्झिट पोलवर प्रतिक्रिया देतानाच दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी : देशात सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यांत मतदान झालं, शनिवारी मतदानाचा सातवा टप्पा पार पडला आणि त्यानंतर लगेचच एक्झिट पोल देखील समोर आले. या एक्झिट पोलवर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'सर्व्हे खरे असतात असा काही भाग नाही. जनतेचा पोल घेतला तर सर्व्हे खोटे पडतील. पंतप्रधान प्रचारात घसरले.हे सर्व्हे फोल ठरतील असं' अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले दानवे?
'सर्व्हे खरे असतात असा काही भाग नाही, जनतेचा पोल घेतला तर सर्व्हे खोटे पडतील. पंतप्रधान प्रचारात घसरले.हे सर्व्हे फोल ठरतील. इंडिया आघाडीला देशआत 295 च्या आसपास जागा मिळतील. महाराष्ट्रात मोठे यश मिळणार आहे. महाविकास आघाडीला राज्यात 31 पेक्षा जास्त जागा मिळतील. जनमत उद्धव ठाकरे यांच्या मागे आहे .पवार साहेबांना पण यश मिळणार आहे. सर्व्हेवर आमचा विश्वास नाही. कर्नाटकात काँग्रेसच्या बाजूनं जनमत आहे.' असं दानवे यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी ईव्हीएमवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'ईव्हीएमवर सर्वांनाच साशंकता आहे. मतमोजणी करताना फॉर्म ठेवण्याचे ठरले आहे. सगळ्या व्होटिंग मशीनवर लक्ष ठेवायला हवं. मी राज्यातील महाविकास आघाडीच्या पोलिंग एजेंटला सांगणार आहे. कोणाला किती मतं मिळतात याशी आम्हाला देणं घेणं नाही, मात्र आम्हाला यश मिळणार आहे.' असं दानवे यांनी म्हटलं आहे.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
June 02, 2024 11:53 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Maharashtra politics : '...तर एक्झिट पोल खोटे ठरणार, इंडिया आघाडीला इतक्या जागा मिळतील'; दानवेंनी आकडाच सांगितला