Traffic Changes: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, वेरूळ आणि खुलताबाद जाणाऱ्या वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर तसेच वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. त्यासोबतच खुलताबाद येथे भद्रा मारुती हे सुद्धा देवस्थान आहे. श्रावण महिन्यामध्ये सोमवारी आणि शनिवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी घृष्णेश्वर आणि खुलताबाद या ठिकाणी जात असतात.
प्रामुख्याने शनिवारी भद्रामारुतीला हजारोंच्या संख्येने रस्त्याने पायी जाण्याची प्रथा आहे. शिवाय, सोमवारी वेरुळ येथील तीर्थकुंडातून पाणी कावडीद्वारे विविध ठिकाणी पायी घेऊन जातात. त्या पार्श्वभूमीवर शहर तसेच वाहतूक पोलिसांनी या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.
Aajache Rashibhavishya: चिंता नाहीशी होईल, गुंतवणुकीचा फायदा होणार, 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?
advertisement
वेरुळच्या दिशेने जाणाऱ्या सर्व मार्गावर 26 जुलै ते 23 ऑगस्ट दरम्यान सर्व प्रकारची जड वाहतूक बंद करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. तर प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी 6 ते शनिवारी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दौलताबाद टी पॉईंट ते खुलताबादच्या दिशेने जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार असल्याचे शहर वाहतूक विभागाकडून सांगितले आहे.
advertisement
वेरूळ आणि खुलताबादला जाण्यासाठी हा असेल पर्यायी मार्ग
छत्रपती संभाजीनगरकडून नाशिक, धुळ्याकडे जाणारी जड, मध्यम वाहने भगवान महावीर चौक (बाबा चौक), नगरनाका, एस. एस. क्लब, करोडीमार्गे सोलापूर-धुळे महामार्गावरून जांभाळा कसाबखेडा फाटा वेरुळमार्गे येतील आणि जातील. तर नाशिक, धुळ्यावरून शहरात येणारी मध्यम आणि जड वाहने कसाबखेडा फाटा, करोडी, एस.एस. क्लबमार्गे सरळ शहरात येतील.
advertisement
खुलताबाद मार्ग या तारखांना बंद
25 जुलै ते 23 ऑगस्ट या काळात प्रत्येक शुक्रवारी सायं. 6 ते शनिवारी रात्री 1 वाजेपर्यंत नगरनाका ते दौलताबाद टी पॉईंटमार्गे मध्यम आणि जड वाहनांसाठी बंद राहील. तर दौलताबाद टी पॉईंट ते दौलताबाद घाटमार्गे पुढे खुलताबादच्या दिशेचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असणार आहे.
advertisement
वेरूळच्या मार्गांत बदल (मध्यम व जड वाहने)
कन्नडकडून येणारी वाहने कसाबखेडा फाटा, वरझडी, माळीवाडा, शरणापूर फाट्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे येतील. तर धुळ्याकडून येणारी वाहने धुळे, शिवूर, देवगाव कसाबखेडा फाटामार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येतील. छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा वरझडी, कसाबखेडा फाटामार्गे कन्नडकडे जातील. तर धुळ्याकडे जाणारी वाहने कसाबखेडा फाटा, देवगाव रंगारी शिवूरमार्गे पुढे जातील.
advertisement
फुलंब्रीकडून कन्नडकडे जाणारी वाहतूक छत्रपती संभाजीनगर, शरणापूर फाटा, माळीवाडा, वराडी कसाबखेडा फाटामार्गे कन्नडकडे जाईल. तर फुलंब्रीकडून धुळ्याकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर, कसाबखेडा फाटा, देवगाव रंगारी शिवूरमार्गे पुढे जातील.
तर अशा पद्धतीने या मार्गामध्ये बदल करण्यात आलेला आहे तरी सर्वांनी याची दखल घ्यावी आणि सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
July 24, 2025 10:33 AM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Traffic Changes: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, वेरूळ आणि खुलताबाद जाणाऱ्या वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?