Railway Ticket: रेल्वेचा प्रवास महागला! छ. संभाजीनगरहून मुंबई, दिल्लीसाठी किती मोजावे लागणार?

Last Updated:

Railway Ticket: रेल्वे विभागाकडून नुकतीच प्रवासी भाडेवाढ करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपती आदी शहरांत जाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतील.

Railway Ticket: रेल्वेचा प्रवास महागला! छ. संभाजीनगरहून मुंबई, दिल्लीसाठी किती मोजावे लागणार?
Railway Ticket: रेल्वेचा प्रवास महागला! छ. संभाजीनगरहून मुंबई, दिल्लीसाठी किती मोजावे लागणार?
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रासह मराठवाड्यात रेल्वेचं मोठं जाळं असून रोज हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मराठवाड्यातून मुंबई, दिल्लीसह हैद्राबाद आणि दक्षिणेतील इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. आता याच प्रवाशांना भाडेवाढीचा चटका सहन करावा लागणार आहे. छत्रपती संभाजीनगरहून बाहेरच्या शहरात जाणाऱ्या रेल्वेच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ क्लासनिहाय 10 ते 40 रुपयांपर्यंत असल्याची माहिती आहे.
रेल्वे विभागाकडून नुकतीच प्रवासी भाडेवाढ करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपती आदी महत्त्वाच्या शहरांमध्ये जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वेच्या स्लीपर क्लास ते वातानुकूलित शयनयान श्रेणीत वाढ झाली आहे. जनरल तिकीट दरात 5 ते 15 रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे.
advertisement
विशेष रेल्वेच्या तिकीट दरांत देखील वाढ करण्यात आली असून छत्रपती संभाजी नगर येथून विविध ठिकाणी साप्ताहिक रेल्वे आहेत. विशाखापटनम, विजयवाडा, चेन्नई, हजरत निजामुद्दीन आदी ठिकाणी गाड्या आहेत. 1 जुलैपासून रेल्वेची भाडे वाढ लागू करण्यात आली आहे. संबंधित भाडेवाढ एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्यांसाठी लागू असून विशेष रेल्वेचे तिकीट या जनरलपेक्षा जास्त राहणार आहे.
advertisement
जुने व नवे तिकीट दर
छत्रपती संभाजीनगर ते मुंबई
छत्रपती संभाजीनगर वरून मुंबईला जाण्यासाठी स्लीपरचे भाडे हे पूर्वी 235 रुपये होते, तर आता हे भाडे 245 रुपये झाले आहे. तसेच थ्री एसीसाठी पूर्वी 635 मोजावे लागत होते, आता 665 रुपये तिकीट असेल. तर टू एसीसाठी पूर्वी 900 रुपये तिकीट दर होते, आता 920 रुपये असणार आहे. फर्स्ट एसी तिकीटाचे दर 1495 रुपयांवरून 1535 एवढे झालेले आहेत.
advertisement
छत्रपती संभाजीनगर ते नवी दिल्ली
छत्रपती संभाजीनगरहून नवी दिल्लीला जाण्यासाठी स्लीपरचे भाडे 620 एवढे होते, आता 645 रुपये मोजावे लागतील. थ्री एसीसाठी 1630 ऐवजी 1680 रुपये तिकीट असेल. टू एसीसठी पूर्वी 2235 तिकीट दर होते, ते आता  2390 एवढे झाले आहे. तसेच फर्स्ट एसीसाठी 3955 एवढे असणारे तिकीट दर 4030 एवढे झालेले आहेत.
advertisement
छत्रपती संभाजीनगर ते सिकंदराबाद
छत्रपती संभाजीनगरवरून सिकंदरबादला जाण्यासाठी स्लीपरचे तिकीट 310 एवढे होते, आता 320 रुपये झाले आहे. थ्री एसीचे तिकीट 835 वरून 855 झाले आहे. तर टू एसीचे तिकीट दर 1170 वरून 1215 एवढे झाले आहे. फर्स्ट ऐसीसाठी पूर्वी 1960 रुपये असणारे तिकीट दर आता 2010 रुपयांवर गेले आहेत.
छत्रपती संभाजीनगर ते तिरुपती
छत्रपती संभाजी नगरवरून तिरुपती बालाजीला जाण्यासाठी पूर्वी स्लीपरचे तिकीट दर 525 होते. आता या प्रवसासाठी 545 रुपये मोजावे लागतील. तसंच थर्ड एसीच 1405 वरून 1450 रुपये झाले आहे. टू एसीसाठी 2025 ऐवजी 2075 रुपये मोजावे लागतील.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Railway Ticket: रेल्वेचा प्रवास महागला! छ. संभाजीनगरहून मुंबई, दिल्लीसाठी किती मोजावे लागणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement