डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात खळबळ, कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Last Updated:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विहिरीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने विद्यापीठ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीलगत असलेल्या विहिरीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने विद्यापीठ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (२ नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बेगमपुरा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

तीव्र दुर्गंधीमुळे घटना उघडकीस

विद्यापीठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी दिली होती. दुर्गंधीचा स्रोत शोधण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी विहिरीच्या दिशेने पाहणी केली असता, त्यांना विहिरीच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. मृतदेह पाहताच त्यांनी तातडीने बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांना घटनेची माहिती दिली.
advertisement
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जगताप पोलीस पथकांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच, मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी पदमपुरा अग्निशमन दलाचे पथकही बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर विहिरीतील मृतदेह बाहेर काढला आणि तो पोलिसांच्या ताब्यात दिला.

आत्महत्या की घातपात?

सध्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मृत व्यक्ती कोण आहे, तो विद्यापीठाचा विद्यार्थी आहे की बाहेरील व्यक्ती, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी या घटनेची प्राथमिक तपासणी सुरू केली असून, हे प्रकरण आत्महत्या आहे की त्यामागे घातपात आहे, या दोन्ही शक्यतांच्या दिशेने तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात खळबळ, कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement