EVM मशीन घेऊन पळून चालले, गावात एकच वादळ उठलं; पोलिसांनाच घेरलं, खुलताबादमधला प्रकार
- Published by:Sachin S
Last Updated:
पोलीस ईव्हीएम मशीन घेऊन जात आहे अशी कुणीतरी अफवा पसरवली. ही अफवा काही क्षणभरात शहरात वाऱ्यासारखी पसरली.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मतदानानंतर ईव्हीएम मशीन स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. पण मतमोजणीसाठी आठवडा बाकी असल्याने स्ट्राँगरूम बाहेर उमेदवार पहारा देतांना पाहायला मिळत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये मात्र एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. एक अफवा पसरली आणि पुढे काय झालं हे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
कुठे स्ट्राँगरूमबाहेर राडा सुरू आहे, तर कुठे उमेदवार स्ट्रॉंगरूमबाहेर ठाण मांडून बसले आहे. 21 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याने तोपर्यंत आपल्या मतपेट्या सुरक्षित आहे, ना याची खातरजमा प्रत्येक उमेदवार करताना पाहायला मिळतोय. पण हे सगळं सुरू असताना छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये जे काही घडलं त्यामुळे ईव्हीएमची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
त्याच झालं असं की, स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन एका पोलीस व्हॅनमधून नेल्या जात असल्याचा अफवा पसरल्याने छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. शेवटी पोलिसांना आपल्या बॅग उघडून दाखवल्यावर लोकांना विश्वास बसला.
खुलताबाद नगरपरिषद निवडणूक 2 डिसेंबर रोजी शांतता पार पडली. त्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन नगरपरिषद कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आले. या ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्यात आलं होतं. पण 4 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास राखीव पोलीस दलांचे पोलीस बंदोबस्तसाठी अमरावती निघाले होते. मात्र, पोलीस ईव्हीएम मशीन घेऊन जात आहे अशी कुणीतरी अफवा पसरवली. ही अफवा काही क्षणभरात शहरात वाऱ्यासारखी पसरली.
advertisement
ईव्हीएम मशीन पळवून नेण्यात येत असल्याच्या अफवेनं मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमला होता. शेवटी स्थानिक पोलिसांना मध्यस्थी करून, बंदोबस्तसाठी आलेल्या राखीव पोलीस दलाच्या बॅगा उघडून दाखवाव्या लागल्या. त्यानंतर लोकांचे समाधान झालं आणि जमाव परत गेलं.
ईव्हीएम बाबत विरोधक आक्रमक भूमिका घेत आहे. अनेकदा याच ईव्हीएम मशीनबाबत वेगवेगळे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यामुळे ईव्हीएम पळवापळवी अफवा देखील पसरतात. पण यावेळी ईव्हीएम पळवण्याचा आरोप थेट पोलिसांवर करण्यात आला. पुढे ही सर्वकाही अफवा असल्याचे स्पष्ट देखील झाले. पण या घटनांमुळे पुढील आठवडाभर हे ईव्हीएम मशीन सांभाळण्याचं प्रशासनासमोर एक आव्हान बनले आहे.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
December 06, 2025 4:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
EVM मशीन घेऊन पळून चालले, गावात एकच वादळ उठलं; पोलिसांनाच घेरलं, खुलताबादमधला प्रकार


