धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Last Updated:

Siddharth Udyan: छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानात भिंत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

संभाजीनगर सिद्धार्थ उद्यान
संभाजीनगर सिद्धार्थ उद्यान
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार या दोन्ही महिला उद्यानात कर्मचारी होत्या. भिंत कोसळून झालेल्या अपघातात इतर ५ जणही गंभीर जखमी आहेत.
प्राथमिक माहितीनुसार स्वाती खैरनाथ (३५ हल्ली मुक्काम रांजणगाव मुळगाव लासलगाव), रेखा गायकवाड (वय ३८, सौभाग्य चौक एन ११ हडको) असे मयत झालेल्या महिलांची नावे आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत महिलांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला उद्यानात काम करीत असतानाच अचानक भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. दगड विटांचा मलबा महिलांच्या अंगावर पडल्याने त्या जागीच गेल्या. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात इतरही पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनाही जवळील रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement