Mumbai: मुंबई किती मोठी? एका क्लिकवर A टू Z माहिती, तुमच्याकडे जुने फोटो असतील तर पाठवा इथं!

Last Updated:

Digital Library: इंग्रजांच्या काळात बांधलेल्या असंख्य वास्तू, रस्ते, बाजारपेठा, तसेच सार्वजनिक ठिकाणं आजही शहराच्या इतिहासाची साक्ष देतात.

+
Mumbai:

Mumbai: मुंबई किती मोठी? एका क्लिकवर A टू Z माहिती, तुमच्याकडे जुने फोटो असतील तर पाठवा इथं!

मुंबई: सात बेटांच्या समूहातून उभी राहिलेली मुंबई आज जगातील सर्वात महत्त्वाच्या महानगरांपैकी एक आहे. इंग्रज भारतात आल्यानंतर मुंबईला व्यापारी आणि औद्योगिक केंद्र म्हणून वेगळीच ओळख मिळाली. इंग्रजांच्या काळात बांधलेल्या असंख्य वास्तू, रस्ते, बाजारपेठा, तसेच सार्वजनिक ठिकाणं आजही शहराच्या इतिहासाची साक्ष देतात.
मात्र, शहराच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे या वारशाचा मोठा भाग हळूहळू धोक्यात जात आहे. आधुनिक इमारती, नवे रस्ते आणि सतत बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे जुने ठसे मिटू लागले आहेत. त्यामुळे मुंबईचा वारसा जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने (CSMVS) एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचललं आहे. या वस्तुसंग्रहालयाने डिजिटल लायब्ररी आर्काइव्हची सुरुवात केली असून 2026 पर्यंत हे सर्वसामान्यांसाठी खुलं होईल.
advertisement
संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार
इतिहासाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, वास्तुशास्त्राचा अभ्यास करणारे संशोधक, तसेच नवीन तरुण पिढी यांना मुंबईबद्दलची महत्त्वाची माहिती एका क्लिकवर मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत संशोधनासाठी अभ्यासकांना प्रत्यक्ष मुंबईत यावं लागायचं. त्यासाठी मोठा खर्च करावा लागायचा आणि अनेकदा हवी तशी माहिती मिळतही नसायची. पण, आता डिजिटल लायब्ररीमुळे जगातील कोणत्याही भागात असलेल्या संशोधकाला मुंबईतील वास्तू, रस्ते, इतिहास, दस्तऐवज, चित्रे, नकाशे आणि आठवणी याबद्दल पुरेपूर माहिती मिळू शकेल.
advertisement
या प्रकल्पाच्या कामात सहभागी असलेल्या डॉ. मंजिरी कामत यांनी सांगितलं की, ही लायब्ररी अशा पद्धतीने तयार केली आहे की, संशोधक किंवा विद्यार्थी कोणालाही हवी ती माहिती अगदी सहजपणे मिळेल. त्यासाठी विशेष तांत्रिक कौशल्याची किंवा ग्रंथालय तज्ज्ञ असण्याची गरज भासणार नाही.
मुंबईकरांनाही देता येईल योगदान
मुंबईकरांनाही या डिजिटल लायब्ररीत आपला सहभाग नोंदवता येणार आहे. ज्यांच्याकडे जुनी छायाचित्रे, नकाशे, कागदपत्रे, पोस्टकार्ड्स किंवा कोणतेही ऐतिहासिक संदर्भ असतील, त्यांनी ती डिजिटल स्वरूपात द्यावीत. ही माहिती थेट संग्रहालयाच्या वेबसाईटवर अपलोड करता येईल किंवा csmysmumbai@gmail.com या ई-मेलवरही पाठवता येईल. या उपक्रमामुळे मुंबईचा ऐतिहासिक वारसा नागरिकांकडूनच इतरांपर्यंत पोहोचेल आणि पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित राहील.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai: मुंबई किती मोठी? एका क्लिकवर A टू Z माहिती, तुमच्याकडे जुने फोटो असतील तर पाठवा इथं!
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement