मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ आता निवडणुकीच्या रिंगणात, कोणत्या मतदारसंघातून मिळली उमेदवारी?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस ज्यावेळी अमरावती दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी आल्हाद कलोदी यांच्या घरी भेट दिली होती.
अमरावती :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामेभाऊ यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. आल्हाद कलोती हे चिखलदरा नगरपालिकेच्या नगरसेवक पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. तर यंदा पहिल्यांदाच निवडणूक लढवीणाऱ्या आल्हाद कलोती यांच्या उमेदवारीमुळे चिखलदरा नगर परिषद निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आल्हाद कलोती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी भाजपचे अमरावती जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, प्रविण पोटे, राजेंद्र सोमवंशी, राजेश मांगलेकर, अन्वर हुसेन यांच्यासह भाजप व युवा स्वाभिमान पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
advertisement
गेल्या आठवड्याच फडणवीस कलोती यांच्या घरी
आल्हाद कलोती यांच्या राजकरणातील प्रवेशामुळे ही निवडणूक अतिशय रंगतदार बनली असून राज्याचे लक्ष लागले आहे. आल्हाद कलौती हे सामाजिक कार्यात गेली अनेक वर्ष सक्रिय आहे. गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस ज्यावेळी अमरावती दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी आल्हाद कलोदी यांच्या घरी भेट दिली होती. आमदार रवी राणा यांनी देखील आल्हाद कलोती यांच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
advertisement
कलोती यांच्या प्रवेशावर रवी राणा काय म्हणाले?
रवी राणा म्हणाले, चिखलदऱ्याच्या सर्वांगिण विकासासाठी आल्हाद कलौची हे योग्य उमेदवार आहे. कलोती निवडून आल्यास विकासाचे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. स्काय वॉक, पर्यटन विकास, रस्ते सुविधा, पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प आणि विद्युत प्रकल्प यासारखे मोठे प्रकल्प हे कलौदी यांच्यामुळेच मार्गी लागले आहे. चिखलदरा हे देवेंद्र फडणवीस यांचे आवडचे हिल स्टेशन आहे. कलोती निवडून आल्यास चित्र पूर्णपणे बदलणार आहे.
advertisement
हे ही वाचा :
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
November 17, 2025 3:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ आता निवडणुकीच्या रिंगणात, कोणत्या मतदारसंघातून मिळली उमेदवारी?


