कोकणवासियांसाठी मोठी बातमी! 'या' घाटात दरड कोसळली, रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
चिपळूण गुहागर महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तासापासून बंद आहे.कारण चिपळूण गुहागर महामार्गावर रामपूर घाटामध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
Ratnagiri News : राजेश जाधव, रत्नागिरी : पावसाळ्यात कोकणात रस्त्याने किंवा रेल्वेने प्रवास करणे खूपच धोकादायक असते. कारण कोणत्याही क्षणी दरड कोसळून रस्ता वाहतूकीसाठी बंद होऊन अटकण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे नागरीकांनी सुरक्षित प्रवास करणे गरजेचे आहे. पणा आता कोकणातील एका घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वाहतूक तब्बल एक दोन तासांपासून बंद आहे.त्यामुळे वाहतुकदारांचे मोठे हाल झाले आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण गुहागर महामार्गावरील वाहतूक तब्बल एक तासापासून बंद आहे.कारण चिपळूण गुहागर महामार्गावर रामपूर घाटामध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मोठ मोठाले दगड आणि झाड रस्त्यावर कोसळली आहे . या घटनेमुळे रस्ता संपूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूने वाहतूक शक्य आहे.त्यामुळे हा महामार्ग रात्रभर बंद राहण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान रात्रीची वेळ असल्या कारणाने सध्या दरड हटवण्याचे काम करण्यात अडचणी येणार आहेत. तरी देखील स्थानिकांच्या मदतीने झाडांची छाटणी आणि दरड हटवण्याचे काम सूरू आहे. सध्या हे कामकाज सूरू आहे.त्यामुळे वाहतूक सूरळीत व्हायला किती वेळ लागणार, हे स्पष्ट सांगता येता येणार नाही आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप होतोय.
advertisement
कोकणात खरं तर दरड कोसळणाऱ्या ठिकाणी जाळ्या बसवण्यात येतात, जेणेकरून महामार्गावर दरड कोसळून अपघात होऊ नये. आता या घटनेत सरंक्षर जाळ्या बसवल्या गेल्या होत्या की नाही. याची माहिती मिळू शकली नाही आहे.पण याघटनेमुळे वाहतून धारकांना प्रचंड त्रास होत आहे.
advertisement
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
August 15, 2025 11:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोकणवासियांसाठी मोठी बातमी! 'या' घाटात दरड कोसळली, रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद