Crime News : जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेल्या त्या परतल्याच नाही, अल्पवयीन मुलींचा संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
चिपळुणमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.या घटनेत गाणे राजवाड्यातील जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या आदिवासी समाजातील दोन अल्पवयीन मुलींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Crime News : राजेश जाधव, चिपळूण, रत्नागिरी : चिपळुणमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.या घटनेत गाणे राजवाड्यातील जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या आदिवासी समाजातील दोन अल्पवयीन मुलींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणात आता अल्पवयीन मुलींच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय समोर येतं? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुली राजवाड्यातील जंगलात शेळ्या चरण्यासाठी गेल्या होत्या. पण त्या काही परतल्याच नाही. त्यानंतर अज्ञाताने याबातची माहिती दिली.त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले होते. यावेळी घटनास्थळी मनोहर वाघे (१५) व सुप्रिया यशवंत वाघे (१४) या अल्पवयीन मुलींचा जंगलात मृत्यू झाला होता. पण त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला? हा मोठा प्रश्नचिन्ह होता.
advertisement
दरम्यान या घटनेनंतर कामथे येथील उपजिल्हा रुग्णालय व दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन त्या दोघींचे तपासणी केली असता विषबाधेतून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. पण दोन मुलींना जंगलात विषबाधा कशीह होऊ शकते.तसेच जर त्यांना आत्महत्याच करायची होती, तर त्या घरातही आत्महत्या करू शकल्या असत्या.त्यामुळे जंगलात त्यांचा मृत्यू कसा झाला? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे.
advertisement
पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्टसाठी दोन्ही मुलींचे मृतदेह पाठवले आहेत. आता या रिपोर्टमधून दोन्ही मुलींच्या मृत्यूचे काय कारण समोर येते. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.मात्र सदरच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
Location :
Chiplun,Ratnagiri,Maharashtra
First Published :
August 21, 2025 11:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Crime News : जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेल्या त्या परतल्याच नाही, अल्पवयीन मुलींचा संशयास्पद मृत्यू, नेमकं काय घडलं?


