दिवाळीनिमित्त कल्याणमध्ये रेडिमेड फराळापेक्षा होम मेड फराळकडे नागरिकांचा कल
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
1952 साली कल्याणमध्ये प्रकाश यांनी सुरू केलेली प्रकाश दुग्धालय डेअरी आज या डेरीचे रूपांतर स्वीटस् मध्ये केले आहे.
दिवाळीनिमित्त कल्याणमध्ये रेडिमेड फराळापेक्षा होम मेड फराळकडे नागरिकांचा कल1952 साली कल्याणमध्ये प्रकाश यांनी सुरू केलेली प्रकाश दुग्धालय डेअरी आज या डेरीचे रूपांतर स्वीटस् मध्ये केले आहे. त्यांच्या प्रकाश दुग्धालय डेअरी ॲन्ड स्वीट्स मध्ये घरगुती पद्धतीत बनवलेले गुलाबजाम, पेढे, श्रीखंड, लोणी, ताक, तूप ड्रायफ्रूडस लाडू, शुगर फ्री लाडू आदी वस्तू भारती राणे या स्वतःच्या हाताने बनवत असतात.
कोणत्याही कारागिरांची मदत न घेता भारती स्वतः मेहनत घेऊन करतात. त्यांच्या या घरगुती स्वीट्सला अनेक ठिकाणाहून मागणी येत असून या व्यवसायात त्यांची चौथी पिढी असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीत त्यांच्याकडे फराळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. फराळमध्ये घरगुती पद्धतीत चकली, लाडू, शंकरपाळी, पोहे चिवडा, मका चिवडा, करंजी, बेसन लाडू आदी फराळ खूप मागणी असल्याने त्यांचे जुने ग्राहकांची दिवाळीसारख्या सणाच्या महिनाभर आधीच मागणीची बुकिंग सुरू होत असते.या काळात त्या कारागिरांची मदत घेत असतात.
advertisement
सगळ्यांत जूनी डेअरी म्हणजे 1952 ची ही डेअरी कल्याणमध्ये प्रथमच असल्याचे समजले. त्यामुळे कल्याण डोंबिवली, ठाणे, जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून जुने ग्राहक प्रकाश डेरी च्या शोधत येत असतात. भारती यांच्या सासऱ्याने सुरू केलेला हा छोटा व्यवसाय भविष्यात खूप मोठा करण्याचा त्यांचं स्वप्न त्यांचा मुलगा वैभव राणे पूर्ण करेल असे त्यांनी म्हटले. मुख्य म्हणजे त्यांचे लोणखंडे तूप म्हणजे कोणतीही क्रीम न वापरता लोणी पासून बनवण्यात येणारे तूप या डेअरीत खूप फेमस आहे. त्यात श्रीखंडाचे वेगवेगळे 14 फ्लेवर त्या स्वतः बनवतात त्यामुळे कल्याणमध्ये श्रीखंड म्हटले की प्रकाश डेअरीच नाव घेतलं जातं.
advertisement
सध्या हा व्यवसाय भारती त्यांचे मिस्टर आणि एक मुलगा असे तिघे जण सांभाळत असल्याने महिन्याचे उत्पन्न फेस्टिव्हलमध्ये लाखात काढत असल्याचे सांगितले आणि इतर वेळेस ही गाईचे दूध, म्हशीचे दूध, शुद्ध तूप यांची मागणी चालूच असते. त्यामुळे त्यांना या व्यवसायाचा मोठा फायदा झाला आहे. त्यांच्या आयुष्याला आकार देण्याचं कामच या व्यवसायाने केले आहे.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
October 17, 2025 3:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दिवाळीनिमित्त कल्याणमध्ये रेडिमेड फराळापेक्षा होम मेड फराळकडे नागरिकांचा कल