Nagpur: ज्याची भीती होती तेच घडलं, नागपूर स्कुल बस अपघातात विद्यार्थिनी आणि चालकाचा मृत्यू

Last Updated:

मानकापूर उड्डाणपुलावर एक स्कूल बस आणि स्कूल व्हॅनची समोरासमोर जोरदार धडक झाली.

News18
News18
उदय तिमांडे, प्रतिनिधी
नागपूर: नागपूरमधून स्कूल बस अपघाताची घटना घडली होती. मानकापूर उड्डाण पुलावर एका स्कुल बसला अपघात झाला होता. या अपघातात उपचारादरम्यान एका 9 व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तर चालकाचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मानकापूर उड्डाण पुलावर शुक्रवारी सकाळी एका खासगी शाळेच्या स्कूलबसला अपघात झाला होता. मानकापूर उड्डाणपुलावर एक स्कूल बस आणि स्कूल व्हॅनची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात आठ विद्यार्थी जखमी झाले होते, त्यापैकी तीन विद्यार्थ्यांना फ्रॅक्चर झालं. तर एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून, तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान,  गंभीर जखमी झालेल्या सानवी खोब्रागडे या नवव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.  9 व्या वर्गात शिकणाऱ्या सानवी सकाळी झालेल्या स्कुल बसच्या अपघातात गंभीर जखमी झाली होती.
advertisement
तर या अपघातातील मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे. आधी ड्रायव्हर आणि आता विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.  मृतक ड्रायव्हरचं नाव रितीक कनोजिया असं आहे.
अपघात कसा झाला? 
मानकापूर परिसरात उड्डाण पुलावर ओव्हरटेकच्या नादात दोन स्कुल बसची समोरासमोर धडक झाली होती.  या दोन्ही स्कूलबसच्या वाहनाची धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला.  एका विद्यार्थिनींनी दिलेला माहितीनुसार स्कुल व्हॅन (मॅजिक) चालवणाऱ्या ड्रायव्हरने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला ओव्हरटेक करत असताना समोरून येत असलेल्या दुसऱ्या स्कुलबससोबत त्याची धडक झाली.
advertisement
पालकांनी देखील स्कूल बस चालक बेजबाबदारीने वाहन चालवत असल्याचं सांगितलं, यामध्ये दोषी असलेल्या वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
या अपघातात आणखी 3 विद्यार्थी फॅक्चर झालेत, सकाळी त्यांच्यावर योग्य उपचार केले असून आता यातील विद्यार्थी उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur: ज्याची भीती होती तेच घडलं, नागपूर स्कुल बस अपघातात विद्यार्थिनी आणि चालकाचा मृत्यू
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement