Eknath Shinde : '...तर पाटणकर काढा द्यायची वेळ येईल', ऋषी सुनकवरून ठाकरे-शिंदेंमध्ये जुंपली

Last Updated:

भारतामध्ये झालेल्या G20 परिषदेमध्ये देशांचे प्रमुख आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत फोटो काढला.

ऋषी सुनक यांच्यासोबतच्या फोटोवरून उद्धव ठाकरेंचा वार, मुख्यमंत्र्यांचा पलटवार
ऋषी सुनक यांच्यासोबतच्या फोटोवरून उद्धव ठाकरेंचा वार, मुख्यमंत्र्यांचा पलटवार
मुंबई, 13 सप्टेंबर : भारतामध्ये झालेल्या G20 परिषदेमध्ये देशांचे प्रमुख आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत फोटो काढला. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला, यावरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
'G20 ची परिषद दर काहीवर्षांनी रोटेशननुसार आपल्या देशात होत असते, त्यात नवीन काही झालेलं नाही. याआधीही झाली, आताही झाली आणि यानंतर काही वर्षांनीही होईल, त्यावेळी पंतप्रधान नक्कीच दुसरे असतील. मुख्यमंत्र्यांना तिकडे जायला वेळ आहे, पण जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत, त्यांना भेटायला जायला वेळ नाही.
जी20 मध्ये पंतप्रधान लगबग करत आहेत, आमचे मुख्यमंत्री तिकडे गेले, एकतर बेकायदा मुख्यमंत्री, हे कोर्टाचं म्हणणं आहे. आपलं तर म्हणणं गद्दार आहे. तुम्ही तिकडे काय बायडनशी बोलणार आहात का? ऋषी सुनकसोबत फोटो, काय बोललात ते सांगा, बर कोणत्या भाषेत बोललात ते पण सांगा. ते काय बोलले ते तुम्हाला कळलं का? तुम्ही काय बोलले ते त्यांना कळलं का? पण फोटो आला पाहिजे, चमकोगिरी करायची', असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
advertisement
एकनाथ शिंदेंचा पलटवार
'ऋषी सुनक यांनी मला विचारलं, हाऊ इज यूटी? यूटी म्हणजे काय? मी म्हणालो व्हाय? ते म्हणाले दरवर्षी लंडनला येतात. मोठमोठ्या प्रॉपर्टी बनवतात, थंडगार हवा खातात, त्यांचं खूप माझ्याकडे आहे. एकदा लंडनला आलात की मी सगळं सांगतो. मी एवढच सांगतो आम्हाला सगळं माहिती आहे, आम्हाला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. नाहीतर पाटणकर काढा घेण्याची वेळ आपल्यावर येईल', असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : '...तर पाटणकर काढा द्यायची वेळ येईल', ऋषी सुनकवरून ठाकरे-शिंदेंमध्ये जुंपली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement