VIDEO : आधी शिविगाळ, मग अंगावर धावून आले...CNG पंपावर दाम्पत्याला मारहाण,अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सीएनजी भरायला गेलेल्या एका दाम्पत्याला सीएनजी चालकाकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.शिर्डीनजीक सावळीविहीर बुद्रुक येथील आर जे पेट्रोल अँड सीएनजी पंपावर ही घटना घडली आहे
शिर्डी / अहिल्यानगर : अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सीएनजी भरायला गेलेल्या एका दाम्पत्याला सीएनजी चालकाकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.शिर्डीनजीक सावळीविहीर बुद्रुक येथील आर जे पेट्रोल अँड सीएनजी पंपावर ही घटना घडली आहे. सीएनजी भरायला भलीमोठी रांग असताना काही नागरीकांना रांग न लावताच सीएनजी भरून दिला जात होता.या गोष्टीचा जाब विचारल्यामुळे या दाम्पत्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेनंतर महिलेच्या तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईदर्शनानंतर मुंबईकडे परतणाऱ्या नमिता घरद या त्याच्या पतीसह शिर्डीनजीक सावळीविहीर बुद्रुक येथील आर जे पेट्रोल अँड सीएनजी पंपावर सीएनजी भरण्यासाठी आल्या होत्या. या पंपावर सीएनजी भरण्यासाठी भलीमोठी रांग होती. ही रांग असताना देखील काही लोकांना मध्येच घुसवून सीएनजी भरून दिला जात होता. याबाबतची माहिती नमिता घरद यांना मिळताच त्यांनी सीएनजी मालकाच्या ऑफिसात जाऊन जाब विचारला असता, त्यांना शिविगाळ झाल्याचा आरोप त्यांनी केला. या आरोपानंतर सीएनजी मालकाने आणि त्यांच्या पंपावरील कर्मचाऱ्यांनी दाम्पत्याला धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची घटना घडली आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement
CNG पंपावर दाम्पत्याला मारहाण,अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना pic.twitter.com/FDi481N96E
— News18Lokmat (@News18lokmat) October 25, 2025
नमिता घरद या प्रकरणावर म्हणाल्या की, आम्ही काल सीएनजी टाकायला आलेलो आणि दोन तास थांबलो देखील, पण सीएनजी संपल्यांमुळे आम्ही परत गेलो. आज परत आलो आम्ही आणि अडीच तास व्हायला आले, पण गाड्या पुढेच सरकत नव्हत्या.त्यामुळे पुढे जाऊन जाब विचारला असता सीएनजीच प्रेशर कमी झाल्यामुळे थांबाव लागेल,असे आम्हाला सांगितले.
advertisement
त्यानंतर अचानक एक गाडी आली आणि त्या दरम्यान सीएनजी मालकाला फोन आला.यावर मी कर्मचाऱ्याला विचारलं असं कॉल आल्यावर तुम्ही डायरेक्ट सीएनजी देता.यावर त्याने मालकाचा दाजी असल्याच सांगितलं.त्यानंतर मी आमच्या गाडीत सीएनजी भरू दे मग त्यांच्या गाडीत भरा असे सांगितल्यानंतर तो त्याने शिविगाळ सूरू केली. त्यानंतर आम्हाला मालकाने आणि त्याच्या कर्मचाऱ्याने मारहाण केली,असा आरोप नमिता घरद यांनी केला आहे.
advertisement
या घटनेनंतर नमिता घरद यांनी शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून कलम 115, 352, 351 अंतर्गत आर जे पेट्रोलियमच्या मालकासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
view commentsLocation :
Ahmadnagar (Ahmednagar),Ahmadnagar,Maharashtra
First Published :
October 25, 2025 11:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO : आधी शिविगाळ, मग अंगावर धावून आले...CNG पंपावर दाम्पत्याला मारहाण,अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना


