शेअर मार्केटसाठी अल्पवयीन पोरं बनले दरोडेखोर, पोलिसाच्या घरातून 21 लाखांचं सोनं लंपास
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सातारा जिल्ह्याच्या कराड शहरात कॉलेजला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात दरोडा टाकला आहे.
विशाल पाटील, प्रतिनिधी सातारा: सातारा जिल्ह्याच्या कराड शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं कॉलेजला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात दरोडा टाकला आहे. आरोपींनी पोलिसाच्या घरातून एक दोन नव्हे तर तब्बल साडेसोळा तोळे सोनं चोरून नेलं होतं. पण कराड पोलिसांनी अवघ्या २४ तासात घटनेची उकल केली आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना बेड्या ठोकल्या आहेत.
ज्यावेळी पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली, तेव्हा भयानक प्रकार समोर आला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी तरुणांनी ही चोरी केल्याचं उघड झालं आहे. यात शेअर मार्केटचा क्लास घेणाऱ्या काही जणांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. क्लास घेणाऱ्यांनीच मुलांना चोरी करायला प्रवृत्त केल्याची माहिती आहे. पोलीस सविस्तर तपास करत आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, शेअर मार्केटच्या क्लासेस चालकांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून तुम्ही खूप पैसे कमवू शकता. तुम्हाला घरातील लोक पैसे देणार नाहीत, असं सांगितल्यानं अल्पवयीन मुलांनी एक-दोन नव्हे तर तब्बल साडेसोळा तोळे सोने चोरल्याचे तपासात समोर आले आहे.
या अल्पवयीन मुलांना पैशाचा हव्यास दाखवणाऱ्या दोघांना कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैभव सुभाष वाघमारे आणि अभिजीत सुभाष बोडरे अशी दोघांची नावे आहेत. हे दोघं अल्पवयीन मुलांना पैशाचे आमिष आणि घरातील लोक पैसे तुम्हाला मोठे होण्यासाठी देणार नाहीत, असे सांगत. त्यामुळे अल्पवयीन मुलांकडून घरफोडी, चोरी अशा घटना करवून घेतल्याचं तपासातून समोर आलं आहे. कराड पोलिसांनी चोरून नेलेलं सोनं जप्त करून मूळ मालकाला परत केले आहेत. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
December 04, 2025 12:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेअर मार्केटसाठी अल्पवयीन पोरं बनले दरोडेखोर, पोलिसाच्या घरातून 21 लाखांचं सोनं लंपास


