Pradnya Rajeev Satav :काँग्रेसला मोठा धक्का! प्रज्ञा सातवांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपात आज होणार प्रवेश
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Pradnya Rajeev Satav : आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा बुधवारपासूनच राजकीय वर्तुळात जोर धरू लागली होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याच्या दृष्टीने आज सकाळी घडामोड झाली.
मुंबई: काँग्रेस नेते दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा बुधवारपासूनच राजकीय वर्तुळात जोर धरू लागली होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याच्या दृष्टीने आज सकाळी घडामोड झाली. काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी अखेर आज आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधान परिषदेच्या विधीमंडळ सचिवांकडे हा राजीनामा सुपूर्द केला आहे.
प्रज्ञा सातव यांच्याकडे विधान परिषद आमदारकीचा २०३० पर्यंतचा कार्यकाळ आहे. भाजप प्रवेशाआधीच त्या आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. डॉ. प्रज्ञा सातव यांन आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. सातव यांच्या निर्णयामुळे हिंगोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
प्रज्ञा सातव या काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांना २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरू असतानाच आजारपणामुळे निधन झालं. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष आहेत. सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर २०२१ साली विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती.
advertisement
प्रज्ञा सातव या पहिल्यांदा २०२१ मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या. २०३० पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. सातव कुटुंब हे काँग्रेसच्या विचारांचे घराणं समजलं जातं. मात्र, प्रज्ञा सातव या भाजपात प्रवेश करत असल्याने काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे समजलं जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2025 10:53 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pradnya Rajeev Satav :काँग्रेसला मोठा धक्का! प्रज्ञा सातवांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपात आज होणार प्रवेश










