नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात नाना पटोलेंचा विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, कोणकोणते मंत्री आणि अधिकारी अडकले?

Last Updated:

Nana Patole Pendrive Bomb: हनी ट्रॅप प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात खळबळ उडालेली असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी आज विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला.

नाना पटोले (काँग्रेस नेते)
नाना पटोले (काँग्रेस नेते)
मुंबई : महायुती सरकारमधील अनेक मंत्री आणि प्रशासनात काम करणारे अनेक उच्चपदस्थ अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेवर होत आहे. नाशिक, ठाणे आणि मुंबई या ठिकाणी हनी ट्रॅल लावला होता, अशी शक्यता व्यक्त करण्यात आहे. या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात खळबळ उडालेली असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी आज विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला.
महायुती सरकारमधील मंत्री आणि तब्बल ७२ अधिकारी यांचे अतिशय संवेदनशील व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. हे सर्वजण हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा संशय व्यक्त केला जातोय. याच प्रकरणाशी संबंधित पेन ड्राईव्ह नाना पटोले यांनी विधानसभेत सादर करून 'त्या' मंत्र्‍यांची धाकधूक वाढवली आहे.

नाना पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब

मला कुणाचेही चारित्र्यहनन करायचे नाही. परंतु सरकार या प्रकरणावर संवेदनशील आहे की नाही? जर सरकार संवेदनशील असेल तर मग उपमुख्यमंत्री महोदय निवेदन का सादर करीत नाहीत? असा सवाल विचारून माझ्याकडे हनीट्रॅप प्रकरणाशी संबंधित पेनड्राईव्ह आहे. तो पाहिजे असेल तर मी तुम्हाला देतो, असे नाना पटोले म्हणाले. त्यावर सत्ताधारी पक्षातून पेन ड्राईव्हमध्ये काय आहे, असे विचारले. त्यावर तुमच्या मंत्र्यांचे प्रताप पाहायचे असतील आणि सरकारला त्याचे काही वाटत नसेल तर अवश्य पेनड्राईव्ह देतो, असे नाना पटोले म्हणाले.
advertisement
नाना पटोले यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बने हनी ट्रॅप प्रकरणात कोणकोणत्या आजी माजी मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची नावे समाविष्ट असतील, यासंबंधी राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. दुसरीकडे काही अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी मात्र या प्रकरणावर मौनव्रत धारण केले आहे.

भांडाफोड होऊ नये म्हणून पडद्यामागे तडजोडी आणि वाटाघाटी?

हनी ट्रॅप'चा मास्टरमाइंड नाशिकचाच असून तो एका मोठ्या राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येते. एका राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याने पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये याबाबतचा भांडाफोड केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उजेडात आला. नाशिक सह मुंबई आणि अन्य ठिकाणीही महिलेने हनी ट्रॅप लावला असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे संबंधित प्रकरणाची वाच्यता होऊ नये यासाठी पडद्यामागे तडजोडी आणि वाटाघाटी गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असल्याची चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.
advertisement

...तर सरकार त्यांची चौकशी करेल, महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा

विरोधकांच्या आरोपावर सरकारच्या वतीने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका मांडली.'हनी ट्रॅप' प्रकरणात राज्यातील सरकारी अधिकारी, आजी-माजी मंत्री अडकले असतील तर सरकार त्यांची चौकशी करेल, अशी घोषणा महसूलमंत्री बावनकुळे यांनी केली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात नाना पटोलेंचा विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, कोणकोणते मंत्री आणि अधिकारी अडकले?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement