CBSE बोर्डाकडून ‘CTET’च्या तारखा जाहीर; परीक्षा केव्हा, अर्ज कसा करायचा? माहिती Detail मध्ये

Last Updated:

CTET 2026 Exam Date Announced: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा देशभरातील 132 शहरांमध्ये 20 भाषांमध्ये घेतली जाणार आहे.

News18
News18
टीईटी परीक्षा ही शिक्षकांच्या पात्रतेसाठी घेतली जाते. राज्य सरकारप्रमाणे केंद्र सरकारच्या असलेल्या शाळेतल्या शिक्षकांनाही आता टीईटीची परीक्षा देणं अनिवार्य असणार आहे. परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनाच शाळेमध्ये शिकवता येणार आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही सीटीईटीची परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. ही परीक्षा देशभरातील 132 शहरांमध्ये 20 भाषांमध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच सीबीएसई बोर्डाच्या शाळेमध्ये शिकवण्याची संधी मिळेल.
इच्छुक उमेदवारांना परीक्षेचे तपशील, अभ्यासक्रम, भाषा, पात्रता निकष, परीक्षा शुल्क, परीक्षेचे शहर आणि महत्त्वाच्या तारखा यासंबंधीची सविस्तर माहिती CTETच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल. डिसेंबर 2026 च्या नोंदणीसाठी, उमेदवारांनी ctet.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावे. 'apply for CTET 2026' या लिंकवर क्लिक करावे. नोंदणी पूर्ण करून सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील भरावेत. परीक्षा केंद्र, पेपर (I किंवा II, किंवा दोन्ही) आणि प्राधान्याची भाषा निवडावी. उमेदवारांनी त्यांच्या पासपोर्ट-आकाराचा फोटो आणि सही आवश्यक फॉरमॅटनुसार अपलोड करावी. त्यानंतर अर्ज सादर करावा.
advertisement
परीक्षेचा अर्ज भरतानाच उमेदवारांना अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. अर्ज शुल्क जो पर्यंत भरणार नाही, तोपर्यंत उमेदवारी कन्फर्म होणार नाही आणि हॉलतिकिट सुद्धा मिळणार नाही. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आणि ओबीसी उमेदवारांना एका पेपरसाठी 1000 रुपये आणि दोन्ही पेपरसाठी 1200 रुपये इतकं शुल्क आकारलं जाणार आहे. तर, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी एका पेपरसाठी 500 रुपये आणि दोन्ही पेपरसाठी 600 रुपये इतके अर्ज शुल्क आकारले जाणार आहे.
advertisement
'सीटीईटी' परीक्षा यावर्षी डिसेंबरमध्ये अपेक्षित आहे. 'सीटीईटी' परीक्षा दोन पेपरमध्ये विभागलेली आहे. पेपर I हा इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत शिकवू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी आहे, तर पेपर II हा इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत शिकवू इच्छिणाऱ्यांसाठी आहे. परीक्षेत 150 बहुपर्यायी प्रश्न (MCQs) असतील आणि नकारात्मक गुणदान पद्धती नाही. नकारात्मक गुणदान पद्धत नसल्यामुळे उमेदवारांसाठी ही जमेची बाजू आहे. सीटीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ही परीक्षा पद्धत माहित असणे महत्त्वाचे आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
CBSE बोर्डाकडून ‘CTET’च्या तारखा जाहीर; परीक्षा केव्हा, अर्ज कसा करायचा? माहिती Detail मध्ये
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement