Dahi Handi : महाराष्ट्रात दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट, गोविंदाची मृत्यूसोबतची झुंज अपयशी

Last Updated:

मंगळवारी राज्यभरात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, पण जळगावच्या पाचोऱ्यात दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलं आहे.

महाराष्ट्रात दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट, गोविंदाची मृत्यूसोबतची झुंज अपयशी
महाराष्ट्रात दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट, गोविंदाची मृत्यूसोबतची झुंज अपयशी
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी
जळगाव : मंगळवारी राज्यभरात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, पण जळगावच्या पाचोऱ्यात दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागलं आहे. पाचोऱ्यात गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. उपचारादरम्यान आज अखेर गोविंदाची प्राणज्योत मालवली आहे.
पाचोरा शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दहीहंडीत 35 वर्षीय गोविंदा पडल्याने जखमी झाला होता. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पाचोरा शहरातील रिक्षा स्टॉप सह स्टेशन रोड परिसरात युवकांनी दहीहंडीचं आयोजन केलं होतं. यावेळी गोविंदा पथकातील नितीन पांडुरंग चौधरी हा 32 वर्षांचा गोविंदा दहीहंडी फोडताना खाली पडला.
advertisement
जखमी झाल्यानंतर नितीन चौधरीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण आज 28 ऑगस्ट रोजी त्याची मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली. नितीन चौधरीच्या मृत्यूने शहरात शोककळा पसरली आहे.
मुंबईत 106 गोविंदा जखमी
दरम्यान मुंबईतल्या दहीहंडीमध्ये 106 गोविंदा जखमी झाले. केईएम रुग्णालयात एकूण 10 पेशंट ऍडमिट आहेत, यातले 2 पेशंट डॉक्टरच्या देखरेखीखाली आहेत. तर उरलेल्या 8 पैकी 5 गोविंदांना गंभीर इजा झाली आहे. सुदैवाने त्यांच्या जीवितास कोणताही धोका नाही. या गोविंदांवर ऑर्थोपेडिक विभाग अंतर्गत सर्जरी केली जाण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dahi Handi : महाराष्ट्रात दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट, गोविंदाची मृत्यूसोबतची झुंज अपयशी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement