advertisement

महायुतीत हालचालींना वेग, मध्यरात्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला दौऱ्यावर, नक्की काय घडतंय?

Last Updated:

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री तातडीने दिल्ली अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. दिल्लीत जाऊन ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

News18
News18
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. कोणत्याही क्षणी निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडताना दिसत आहे. युतीने एकत्र निवडणूक लढवायची की स्वबळावर लढवायची? हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात अंतर्गत धुसफूस बघायला मिळत आहे. पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी तर स्वबळाचा नारा दिला आहे. यानंतर भाजपनं देखील स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. निवडणुकीच्या रणनीतीबाबत महायुतीत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.
दरम्यान, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. दिल्लीत जाऊन ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. शिंदे यांनी यापूर्वी देखील अनेकदा अचानक दिल्ली दौरे केले आहेत. दिल्लीत जाऊन ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्या भेटी घेतल्या होत्या. आता पुन्हा एकदा अचानक उपमुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
advertisement
एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीला गेले. आज ते पुन्हा रिटर्न येण्याची शक्यता आहे. ते दिल्लीला नेमकं कशासाठी गेले? महायुतीत सर्व काही आलबेल नाहीये का? असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महायुतीत हालचालींना वेग, मध्यरात्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला दौऱ्यावर, नक्की काय घडतंय?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement