Anna Hazare On Delhi Election Results : दारुनं केजरीवालांचा दारुण पराभव, अण्णा हजारेंची जळजळीत प्रतिक्रिया....
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Anna Hazare On Delhi Election Results : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली निवडणुकीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अरविंद केजरीवालांवर जोरदार टीका केली आहे.
अहिल्यानगर : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप मुसंडी मारत असल्याचे चित्र आहे. दिल्लीच्या सत्तेतून अरविंद केजरीवालांचा आम आदमी पक्ष पायउतार होणार असल्याची चिन्ह आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली निवडणुकीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अरविंद केजरीवालांवर जोरदार टीका केली आहे.
अण्णा हजारे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली. अरविंद केजरीवाल यांचा पराभव दारुने केला असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले. त्यांनी म्हटले की, दिल्ली सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी दारू संदर्भात जे निर्णय घेतले ते चुकीचे होते. पक्ष हा जनतेच्या प्रश्नासाठी असतो, स्वतः साठी नसतो. ज्यावेळेस स्वार्थी राजकारण सुरू होतं त्यावेळेस माणूस संपतो असेही अण्णा हजारे यांनी म्हटले.
advertisement
अण्णा हजारे यांनी म्हटले की, मी सुरुवातीपासून पक्ष काढण्यास विरोध केला होता. पक्ष आला की त्यात हौसे गवसे आणि नवसे सगळे येतात. त्यामुळे पक्ष बदनाम होतो. अरविंद केजरीवाल यांनी जनतेचा कौल मान्य केला पाहिजे असं मत ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे यांनी व्यक्त केले. राजकारणात प्रवेश न करण्याचा सल्ला मी अरविंद केजरीवालला दिला होता. समाजसेवा करत देशासाठी काम करण्याचा सल्ला आपण दिला होता. मात्र, त्यांनी तो नाकारला असल्याचेही अण्णा हजारे यांनी सांगितले.
advertisement
अरविंद केजरीवाल, किरण बेदी, मनिष सिसोदिया आदींसोबत अण्णा हजारे हे 2012 मध्ये युपीए सरकारच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आणि लोकपालाच्या मुद्यावर दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषणासाठी बसले होते. या आंदोलनानंतर अण्णा हजारे आणि केजरीवालांच्या वाटा वेगळ्या झाल्या. केजरीवाल यांनी आपची स्थापना करत राजकारणात एन्ट्री केली.
दिल्लीत कमळ फुलणार!
2014 सालापासून देशात भाजपची सत्ता असूनही दिल्ली विजयाचं भाजपाचं स्वप्नं काही साकार झालेलं नव्हतं, त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत भाजपाने आपली सर्व ताकद पणाला लावली. 2013, 2015 आणि 2020 असं सलग तीन वेळा आम आदमी पक्षाने निर्विवाद यश मिळवल होतं. आता दिल्लीत भाजपचं कमळ फुलताना दिसत आहे. जवळपास 26 वर्षानंतर दिल्लीच्या सत्तेत भाजप पुनरागमन करणार आहे.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
February 08, 2025 11:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Anna Hazare On Delhi Election Results : दारुनं केजरीवालांचा दारुण पराभव, अण्णा हजारेंची जळजळीत प्रतिक्रिया....