भाजपने ऑफिससाठी महापालिकेची जागा हडपली, राऊतांचा आरोप, फडणवीसांकडून जशास तसं उत्तर

Last Updated:

मुंबईतील भाजपच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्वच प्रमुख भाजप नेते उपस्थित होते.

भाजपच्या नव्या कार्यालयावरून आरोप प्रत्यारोपांचा सामना
भाजपच्या नव्या कार्यालयावरून आरोप प्रत्यारोपांचा सामना
मुंबई : भाजपच्या मुंबईतील नवीन प्रदेश मुख्यालय इमारतीचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या इमारतीच्या जागेवरून संजय राऊतांसह विरोधकांनी भाजपवर आरोपांच्या फैरी डागल्यात. राफेलच्या वेगाने या इमारतीसाठी परवानग्या मिळाल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. मुंबईत उभारण्यात येत असलेल्या या भाजप मुख्यालयावरून राजकारण तापलंय.
मुंबईतील भाजपच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्वच प्रमुख भाजप नेते उपस्थित होते. मुंबईतील मरीन लाईन्स येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या भाजपच्या कार्यालयाच्या जागेवरून मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय. याप्रकरणी संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. भाजपानं राऊतांचे हे आरोप भाजपनं फेटाळलेत.
advertisement
भाजपने ऑफिससाठी महापालिकेची जागा हडपली. राफेलच्या वेगाने भाजप ऑफिसच्या इमारतीला परवानग्या देण्यात आल्या, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. भाजपनं पैसे खर्च करून जागा विकत घेतली आहे. ज्यांना जागा बळकवण्याची सवय त्यांनी बोलू नये, असा पलटवार त्यांनी केला.
या कार्यालयाच्या मंजुरीबाबतची फाईल वेगाने फिरवून तात्काळ निर्णय घेण्यात आल्याचा दावा संजय राऊतांना केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या कार्यालयाबाबत गंभीर आरोप केलाय. सामान्य माणसाप्रमाणे सर्व परवानगी घेऊन कार्यालयासाठीची ही जागा घेतल्याचा दावा करत विरोधकांचे आरोप सत्ताधाऱ्यांनी खोडून काढलेत. भाजपच्या मुंबईतील या कार्यालयाचं भूमिपूजन पार पडत असतानाच त्यावर राजकीय आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी मात्र झडू लागल्यानं राजकारण तापले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपने ऑफिससाठी महापालिकेची जागा हडपली, राऊतांचा आरोप, फडणवीसांकडून जशास तसं उत्तर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement