मुंबईतील महिलांना ५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज, महायुतीने डाव खेळला, फडणवीसांची मोठी घोषणा

Last Updated:

विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मुंबई पालिकेतही महिला मतांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीने मोठं आश्वासन दिले आहे.

महायुती सरकार
महायुती सरकार
मुंबई : मुंबई मनपा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महायुतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यात मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी असून मराठी भाषा आणि मराठी माणसांसाठी अनेक योजना राबवण्याचे आश्वासन महायुतीमार्फत देण्यात आले आहे. ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा उचलून धरल्याने मराठीच्याच मुद्द्याने त्यांना घेरण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मुंबई पालिकेतही महिला मतांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीने मोठं आश्वासन दिले आहे. महिलांना ५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा महायुतीने केली आहे. महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीने घोषणा केली.
प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या माध्यमातून मागील काळात मुंबईतील लाडक्या बहिणींना एक लाखापर्यंतच बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रयोग करण्यात आला. त्यावेळी काही महिलांनी चांगले उद्योग सुरू केले आहेत. आता महापालिकेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पाच लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 'भाजपा-महायुतीच्या वचननामा'चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम, भाजपा-महायुतीचे प्रमुख नेते व इतर मान्यवर उपस्थित होते
advertisement

मध्यमवर्गीय घरातील महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या बिनव्याजी कर्जाचे आश्वासन

महिला बिनव्याजी कर्जाच्या माध्यमातून आपला रोजगार उभा करू शकतात. स्वयंरोजगारातून समृध्दीकडे आणि लाकड्या बहिणींकडून लखपती दीदीकडे असा त्यांचा प्रवास आपण करणार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीत महिलांची मते अतिशय निर्णायक ठरणार आहेत. त्यातही मध्यमवर्गीय घरातील महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या बिनव्याजी कर्जाचे आश्वासन दिल्याने त्यांचे मतपरिवर्तन होण्याची दाट शक्यता असल्याने महायुतीने मोठा डाव खेळल्याची चर्चा आहे.
advertisement

महिलांना बेस्टमध्ये ५० टक्के सवलतीत प्रवास, महायुतीची मोठी घोषणा

महिलांना बेस्टमध्ये ५० टक्के सवलतीत प्रवास, सार्वजनिक ठिकाणांवर, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप पार्क आणि हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी सुरक्षा वाढविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच कचरामुक्त आणि प्रदुषणमुक्त मुंबई, रोहिंग्या, बांग्लादेशी मुक्त मुंबईचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मराठी माणसाला परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठीच्या योजना आखण्यात येतील, अशी ग्वाही महायुतीने दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईतील महिलांना ५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज, महायुतीने डाव खेळला, फडणवीसांची मोठी घोषणा
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement