Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Silver Price Prediction: "चांदीने आतापर्यंत अडीच लाखांचा टप्पा गाठून गुंतवणूकदारांना मालामाल केलंय, पण आता चित्र बदलणार आहे! जगातील मोठ्या बँकेने चांदीच्या दराबाबत धोक्याचा इशारा दिलाय. तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का?
Silver Price: मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले. चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती. त्यामुळे चांदीच्या मागणीत वाढ होत असल्याचे संकेत दिसू लागले होते. त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात होते. आता मात्र एक्सपर्टच्या एका अंदाजाने चांदीच्या दरात मोठी उलथापालथ होण्याची भीती समोर आली आहे.
चांदीच्या दराने ऐतिहासिक उसळण घेतली. चांदीच्या दराने प्रति किलो अडीच लाख रुपयांचा टप्पा गाठला. त्यानंतर चांदीकडून आणखी जबरदस्त रिटर्न मिळेल अशी बाजारात चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता चांदीच उलटफेर होण्याची चिन्हे आहेत.
एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदार टेन्शनमध्ये...
आता चांदीबाबत गुंतवणूकदारांसाठी एक इशारा देण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचएसबीसीने एक अहवाल जारी केली आहे. चांदीच्या किंमती खूप अधिक झाल्या असून या वर्षी दरात चढ-उतार होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चांदीचे अधिक दर आणि मागणी-पुरवठा समीकरणामुळे तीव्र बदल होऊ शकतात, असे अहवालात नमूद केले आहे.
advertisement
एचएसबीसीच्या मेटल्स आउटलुक रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी मजबूत गुंतवणूक आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या औद्योगिक मागणीमुळे चांदीच्या किमती वाढल्या आहेत. बँकेने म्हटले की, २०२५ मध्ये जागतिक चांदीची मागणी अंदाजे १.२ अब्ज औंसपर्यंत पोहोचली आहे. या मागणीचा मोठा भाग सौर पॅनेल उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वाहनांमधून आला आहे.
चांदीच्या खाणीतून उत्पादन वाढवणार?
advertisement
एचएसबीसीचा अंदाज आहे की २०२६ मध्ये चांदीची मागणी कमी होऊ शकते. रिपोर्टनुसार, नवीन सोलर क्षमतेच्या मागणीत घट झाली आहे. जागतिक उत्पादन वाढीतील मंदीमुळे मागणीवर परिणाम होईल, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
पुरवठ्याबाबत बँकेने अंदाज व्यक्त करताना म्हटले की २०२६ मध्ये जागतिक चांदी खाणींचे उत्पादन अंदाजे १.०५ अब्ज औंसपर्यंत वाढू शकते. यामध्ये लॅटिन अमेरिकेतील वाढलेले उत्पादन आणि तांबे आणि जस्त खाणींमधून मिळणारे उप-उत्पादन समाविष्ट आहेत. वाढता पुरवठा आणि कमकुवत होणारी औद्योगिक मागणी यामुळे बाजारपेठेतील तूट कमी होऊ शकते आणि किमतींवर दबाव येऊ शकतो.
advertisement
रिपोर्टनुसार, चांदी ओव्हरवॅल्यूड झाली आहे. त्यामुळे चांदीच्या दरात अस्थिरता दिसण्याची शक्यता आहे. २०२६ मध्ये चांदीच्या किमतीत घट होण्याची शक्यता असल्याचे बँकेने म्हटले.
विद्युतीकरण आणि क्लीन एनर्जीमधील दीर्घकालीन मागणी चांदीच्या दराला आधार देऊ शकते. परंतु शॉर्ट टर्ममध्ये मिळणाऱ्या रिटर्नबाबत बँकेने सावध पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.
रिपोर्टनुसार, पुरवठ्यातील अडचणी कमी झाल्यानंतर २०२६ मध्ये चांदीच्या दरामध्ये सुधारणा होऊ शकते आणि सध्या धातू उच्च जोखीम आणि उच्च अस्थिरतेच्या टप्प्यातून जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 3:08 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?






