Dhananjay Munde: फसवणूक केलेला धसे हा धनंजय मुंडे यांचा ओएसडी, बजरंग बाप्पांनी सगळंच बाहेर काढलं..
- Reported by:SURESH JADHAV
- Published by:Prachi Amale
Last Updated:
जिल्हा परिषदचा कर्मचारी हा माझा स्वीय सहाय्यक होऊ शकत नाही', असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी आरोप फेटाळले आहेत.
बीड: बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीस ठाण्यात धनंजय धसे यांच्याविरोधात तब्बल साडेतेरा लाख रुपयांच्या फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, धनंजय धसे हे सध्या बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे स्वीय सहाय्यक (पी.ए.) म्हणून काम पाहत असल्याची माहिती पुढे आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर खासदार बजरंग सोनावणे यांनी धसे हा माझा पीए नाही,असे म्हणत स्पष्टीकरण दिले आहे. धसे हा धनंजय मुंडेचा पीए असल्याचे सांगत सोनावणे मोठा खुलासा केला आहे.
'2016 मध्ये धनंजय धसे हा राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा ओएसडी होता, तो माझा पी ए नाही. माझे आणि धनंजय धसे यांचे 100% संबंध होते आणि आहेत. धनंजय धसे जिल्हा परिषदेचा शासकीय कर्मचारी आहे. शासकीय कर्मचारी माझा पीए कसा होऊ शकतो मी मंत्री नाही. विनाकारण खासदारांचं नाव लावू नका... बीड जिल्ह्यातील सर्वांना माहीत आहे. जिल्हा परिषदचा कर्मचारी हा माझा स्वीय सहाय्यक होऊ शकत नाही', असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी आरोप फेटाळले आहेत. तर माझा एखादा पी ए जरी असेल त्यांनी गुन्हा केला असेल तर तर त्याला फाशी द्या असा मी म्हणणारा आहे, असेही ते म्हणाले.
advertisement
सोशल मीडियावरील अंध भक्त : बजरंग सोनावणे
बजरंग सोनावणे म्हणाले, सोशल मीडियावरील अंध भक्त आहेत त्यांना एवढी घाई झाली आहे. इथे त्यांचे भक्त आहेत ते माझं नाव घेत आहेत. धनंजय धसे नामक व्यक्ती 2016 ला कुणाचा ओ एस डी होता आणि कुणासोबत होता याची माहिती घेतली पाहिजे... जरा माहिती घ्या माझ्याकडे एक बोट दाखवता तुमच्याकडे सगळेच बोट आहेत माझा काही त्याच्याशी संबंध नाही. सर्वांसोबत फोटो असतात. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीचे पवार साहेब देवेंद्र फडणवीस अजित दादा अमित शहा सोबत फोटो असतील. सर्वांना माहीत आहे.,ओएसडी कुणाचे होते. 2016 च्या कालावधीमध्ये हा ओएसडी कोणाचा होता जिल्हा परिषदचा कर्मचारी मुंबईला 2016 विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बीडचे धनंजय मुंडे साहेबांचे ओएसडी होते.
advertisement
माझं कोणाशी वाकड नाही :बजरंग सोनावणे
धनंजय मुंडे साहेब आणि माझं कुट बी वाकड यावा का असं वाटत आहे का? धनंजय मुंडे साहेब आणि माझं वाकड नाही राजकीय मतभेद आहेत पण वैयक्तिक विषयात काहीही नाही. पंकजा मुंडे आणि माझे वैयक्तिक काहीही नाही. काहीजण काहीजण आमच्यात वाकड आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे बजरंग सोनावणे म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 25, 2025 6:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhananjay Munde: फसवणूक केलेला धसे हा धनंजय मुंडे यांचा ओएसडी, बजरंग बाप्पांनी सगळंच बाहेर काढलं..








