येडेश्वरी मंदिरात गाव गुंडाचा राडा, सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण, भाविकांनाही धक्काबुक्की
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Dharashiv Yermala Yadeshwari Mandir: येरमाळा येथील देवी येडेश्वरीच्या दर्शनासाठी नारळी पौर्णिमेला प्रचंड गर्दी असते. पौर्णिमेच्या निमित्ताने येरमाळा येथील येडेश्वरीच्या डोंगरावर लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध येरमाळा येथील देवी येडेश्वरी मंदिरात गावगुंडांनी प्रचंड राडा केला. येडेश्वरीच्या दर्शनासाठी जात असताना सुरक्षा रक्षकाने हटकल्याने काही जणांनी त्याला जबर मारहाण केली.
येरमाळा येथील देवी येडेश्वरीच्या दर्शनासाठी नारळी पौर्णिमेला प्रचंड गर्दी असते. पौर्णिमेच्या निमित्ताने येरमाळा येथील येडेश्वरीच्या डोंगरावर लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. प्रचंड गर्दी असल्याने भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
यावेळी काही गावगुंडांनी दहशत निर्माण करून गर्दी न पाहता इतरांना बाजूला सारून मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्यांना हटकले. याचाच राग आल्याने चार ते पाच जणांनी त्याच्यावर हल्ला चढवला.
advertisement
सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्यानंतर २० ते २५ जणांनी एकत्र येत मंदिर परिसरात दहशत निर्माण केली. त्यातील अनेकांनी इतर भाविकांनाही धक्काबुक्की केल्याची माहिती मिळत आहे. गावगुंडांच्या गोंधळामुळे भाविकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. मारहाण झालेला सुरक्षा रक्षक तरुण गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे.
view commentsLocation :
Osmanabad,Maharashtra
First Published :
August 09, 2025 6:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
येडेश्वरी मंदिरात गाव गुंडाचा राडा, सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण, भाविकांनाही धक्काबुक्की


