पवनचक्की कंपनीत पुन्हा राडा, कर्मचाऱ्यांचे हात पाय मोडले, डोळ्यांना गंभीर इजा, गावगुंडांचा धुडगूस

Last Updated:

Dharashiv News: पवनचक्कीच्या कामासाठी गावच्या बाजूचा डांबरी रस्ता वापरायचा नाही, असे सांगत वाहन अडवून प्रत्येक वाहनाकडून पैसे घेतले जात होते, असा आरोप मारहाण झालेल्या पीडितांनी केला आहे.

पवनचक्की कंपनीत पुन्हा राडा
पवनचक्की कंपनीत पुन्हा राडा
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : पवनचक्कीचे काम करायचे असेल आणि गावच्या बाजूचा डांबरी रस्ता वाहतुकीसाठी वापरायचा असेल तर पैसे द्या असे म्हणत पवनचक्कीच्या कार्यालयात घुसून पाच कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील ही घटना असून लोहारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवनचक्कीच्या कामासाठी गावच्या बाजूचा डांबरी रस्ता वापरायचा नाही, असे सांगून वाहन अडवून प्रत्येक वाहनाकडून पैसे घेतले जात होते, असा आरोप मारहाण झालेल्या पीडितांनी केला आहे. लोहारा तालुक्यातील धानोरी नंदी पाटील रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली.
मारहाण करणारे पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींनी पीडितांना गंभीर मारहाण करून त्यांचे डोके फोडले तसेच त्यांच्या डोळ्यालाही गंभीर इजा झाली आहे. हातात दगड आणि काठ्या घेऊन जमावाने मारहाण केली.
advertisement
मारहाण झालेल्यांवर उमरगा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून एकाला सोलापूरला हलविण्यात येणार आहे. लोहारा पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री कलम 109, 308, 126, 118, 115, 352, 189, 191, 190, 324(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, घटनेने पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण असून हल्ला करणारे शेतकरी नसून गावगुंड असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पवनचक्की कंपनीत पुन्हा राडा, कर्मचाऱ्यांचे हात पाय मोडले, डोळ्यांना गंभीर इजा, गावगुंडांचा धुडगूस
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement