पंढरपूर समजून तुळजापुरात हेलिकॉप्टर उतरवलं, प्रशासनाने पायलटला 'जागा' दाखवली, दंड वसूल

Last Updated:

हैदराबाद येथून पंढरपूरकडे निघालेले मुंबईच्या हेलिगो चार्टर्ड कंपनीचे हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी दीड वाजता तुळजापूर येथे पोहोचले.

हेलिकॉप्टर
हेलिकॉप्टर
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव: पंढरपूर समजून चक्क पायलटने तुळजापुरात हेलिकॉप्टर उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घडले असे की हैदराबाद येथून पंढरपूरकडे निघालेले मुंबईच्या हेलिगो चार्टर्ड कंपनीचे हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी दीड वाजता तुळजापूर येथे पोहोचले. तुळजाभवानी मंदिरावर घिरट्या घातल्यानंतर त्याने नळदुर्ग रोडवर असलेल्या बांधकाम विभागाच्या हेलिपॅडवर विसावा घेतला.
दरम्यान, हेलिकॉप्टर उतरण्याची कोणतीही सूचना बांधकाम, महसूल, पोलिस प्रशासनाला नव्हती. त्यामुळे या तिन्ही यंत्रणांची एकच धावपळ उडाली. तुळजापूरचे सहायक पोलिस निरीक्षक विजय पवार, कर्मचारी माने यांनी हेलिपॅडवर पडताळणी केली. यावेळी हेलिकॉप्टरच्या कॅप्टनने पंढरपूर येथील परवानगी दाखविली. हे तुळजापूर असल्याचे सांगितल्यानंतर त्याने समन्वयकाकडून येथील लोकेशन मिळाल्याचे सांगितले. तोपर्यंत पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय आवळे हेलिपॅडवर दाखल झाले. विनापरवाना हेलिकॉप्टर लँड केल्याने कंपनीला दहा हजार रुपयांचा दंड केला. तो भरून घेतल्यानंतर सव्वापाच वाजता हेलिकॉप्टरने येथून उड्डाण भरले.
advertisement
तुळजापूर येथील हेलिपॅडवर विना परवाना हेलिकॉप्टर उतरविल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ३० जुलै रोजी हेलिकॉप्टर कंपनीस दहा हजार रुपयांचा दंड केला आहे. पंढरपूर समजून पायलटने तुळजापुरात हेलिकॉप्टर उतरवले होते. यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. अखेर दंड भरल्यानंतर सायंकाळी सव्वापाच वाजता हेलिकॉप्टरने येथून उड्डाण भरले. तुळजापूर हे तीर्थक्षेत्राचे क्षेत्र आहे. येथे भाविकांची कायम वर्दळ असते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बुधवारचा हा प्रकार गंभीर होता पायलटने आणि इतर नागरिकांनी याची खबरदारी घ्यायला हवी, असे आवाहन प्रशासनाने केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पंढरपूर समजून तुळजापुरात हेलिकॉप्टर उतरवलं, प्रशासनाने पायलटला 'जागा' दाखवली, दंड वसूल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement