त्या दोघी शाळेत निघालेल्या पण वाटेतच एकीला मृत्यूनं गाठलं; धाराशिवमधील हृदय पिळवटणारी घटना

Last Updated:

श्रेया सुरेश पात्रे असं या अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. श्रेया ही इयत्ता सहावीत शिकणारी शाळकरी मुलगी होती.

धाराशिवमध्ये भीषण अपघात
धाराशिवमध्ये भीषण अपघात
धारशिव (प्रतिनिधी, बालाजी निरफळ) : राज्यात अपघाताच्या अनेक घटना समोर येत राहतात. आता धाराशिवमधूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका टँकरने दोन शाळकरी मुलींना चिरडलं. या अपघातात एकीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे. ही घटना धाराशिव जिल्ह्यातील हैदराबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील येनेगुरजवळ घडली आहे.
श्रेया सुरेश पात्रे असं या अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. श्रेया ही इयत्ता सहावीत शिकणारी शाळकरी मुलगी होती. तर, या घटनेत श्रद्धा श्रीकांत कांबळे ही सातवीमध्ये शिकणारी विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती देखील गंभीर आहे.
advertisement
येणेगूर येथे महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे अपघात झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तसंच संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग दोन तासांपासून रोखून धरला आहे. महामार्गाचं काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर कारवाईची मागणी गावकऱ्यांची केली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असले तरी गावकरी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून दोन तासापासून गोंधळ सुरू आहे.
advertisement
मुंबई अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी -
दुसऱीकडे, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबई लेनवर सिमेंट काँक्रीटचे काम सुरू आहे, त्यातच खानिवडे जवळ कंटेनर उलटण्यामुळे तिथेही वाहतूक कोंडी झाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मुंबई अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे. गेल्या काही तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवासी कंटाळले आहेत. वसई हद्दीत मोठ्या गाड्यांमुळे जास्त ट्रॅफिक जाम झालं आहे. मुंबई आणि गुजरात दोन्ही लेन मागच्या 4 तासापासून ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
त्या दोघी शाळेत निघालेल्या पण वाटेतच एकीला मृत्यूनं गाठलं; धाराशिवमधील हृदय पिळवटणारी घटना
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement