Big Breaking : काँग्रेसला आणखी एक धक्का; धाराशिवमधून मोठी बातमी समोर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र असलेल्या सुनील चव्हाण यांच्या प्रवेशामुळे महायुतीला फायदा होणार आहे.
बालाजी निरफळ, धारशिव : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. दरम्यान, काँग्रेसला धाराशिवमध्ये आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मधुकर चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरमध्ये भेट घेतली. देवेंद्र फडणवीस हे राम सातपुते आणि रणजितसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोलापूरमध्ये आले असताना त्यांनी भेट घेतली होती. त्यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील हेसुद्धा सोबत होते. बसवराज पाटील यांच्यानंतर आता मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनिल चव्हाण हे देखील भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
सुनिल चव्हाण यांचा पक्षप्रवेश धाराशिवमध्ये होणार आहे. सुनिल चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असून मधुकर चव्हाण प्रवेश करणार नसल्याची माहिती मिळतेय. सुनिल चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला धाराशिवमध्ये मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव सुनील चव्हाण यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिवपद आहे. सुनिल चव्हाण यांनी त्यांच्या काँग्रेसमधील पदाचाही दिला राजीनामा दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
advertisement
मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र असलेल्या सुनील चव्हाण यांच्या प्रवेशामुळे महायुतीला फायदा होणार आहे. महायुतीने अर्चना पाटील यांना उमेदवारी दिलीय. त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी होणाऱ्या सभेत सुनील चव्हाण यांचा प्रवेश होईल. तुळजापूर तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यात सुनील चव्हाण यांचा महायुतीला फायदा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोनच दिवसापूर्वी मधुकर चव्हाण यांनी घेतली होती सोलापूर येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 19, 2024 8:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Big Breaking : काँग्रेसला आणखी एक धक्का; धाराशिवमधून मोठी बातमी समोर