Dharashiv : 6 महिने बँकेची रेकी, 50 लाखांचं सोनं लुटलं; माजी कर्मचाऱ्यासह तिघांना अटक
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवरील दरोड्याचा उलघडा करण्यात धाराशिव पोलिसांना यश आले. दरोड्याप्रकरणी माजी कर्मचाऱ्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
बालाजी निरफळ, 04 जानेवारी : धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवरील दरोडा प्रकरणी पोलिसांनी तिघांनी अटक केली आहे. कर्जातून मुक्त होण्यासाठी आणि झटपट श्रीमंत होण्यासाठी बँकेच्याच माजी कर्मचाऱ्याने बँक लुटल्याचं तपासात उघड झालं. पोलिसांनी मास्टरमाइंड रमेश बळीराम दीक्षित याच्यासह तिघांना अटक केलीय. न्यायालयाने तिघांना ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवरील दरोड्याचा उलघडा करण्यात धाराशिव पोलिसांना यश आले. दरोड्याचा मास्टर माईंड धाराशिव शहरातील विजय चौक येथील रमेश बळीराम दीक्षित यासह 3 जणांना अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली. पोलिसांच्या वेगवेगळ्या 9 पथकांनी तपास करीत दीक्षित याच्यासह नवी मुंबई नेरुळ येथून प्रशांत शिंदे, उदयन वल्लीकालाईल या 3 जणांना अटक केली.
advertisement
दीक्षित याच्याकडून 1 किलो सोने जप्त केले असुन त्याची किंमत 50 लाख आहे. कर्जातून मुक्त होण्यासाठी व झटपट श्रीमंत होण्यासाठी दीक्षित याने हा मार्ग स्वीकारत दरोड्याची योजना आखली आणि गेली 6 महिन्यापासून प्लॅन करीत अनेकवेळा रेकी केली. दीक्षित हा सोनार असुन त्याचे सोन्याचे दुकान आहे, तो 3 वर्षांपूर्वी ज्योती क्रांती बँकेत कामाला होता मात्र त्याने नंतर ते काम सोडले. पोलिसांनी 10 दिवसात गुन्ह्याची उकल करीत आतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 04, 2024 6:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv : 6 महिने बँकेची रेकी, 50 लाखांचं सोनं लुटलं; माजी कर्मचाऱ्यासह तिघांना अटक