मोठी बातमी! धाराशिव लोकसभा मतदारसंघात मोठं ट्विस्ट; बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
धाराशिव लोकसभेसाठी सध्या महायुतीकडून विक्रम काळे यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र त्यातच आता बडा नेेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
धाराशिव, बालाजी निरफळ, प्रतिनिधी : धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी अद्यापही महायुतीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे धाराशिवमधून लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांचंं नाव आघाडीवर आहे. मात्र विक्रम काळे यांच्या नावाची चर्चा असतानाच आता धाराशिव लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षात एक मोठा नेता प्रवेश करणार असून, त्याला उमेदवारी दिली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
धाराशिवच्या जागेसाठी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचं नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळे आता राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवू शकतात अशी देखील चर्चा आहे. मात्र या जागेबाबत अद्याप कोणाताही निर्णय झालेला नाहीये. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतरच या जागेबाबत निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
विक्रम काळे यांचं नाव आघाडीवर
दरम्यान धाराशिव लोकसभेसाठी सध्या विक्रम काळे यांचं नाव आघाडीवर आहे. ते राष्ट्रवादीचे विधान परिषदचे आमदार आहेत. मात्र त्यांचा कार्यकाळ आणखी चार वर्ष बाकी असल्यानं त्यांच्या नावाबाबत देखील संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या महायुतीकडून धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी इतर पर्यायाची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
April 01, 2024 1:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
मोठी बातमी! धाराशिव लोकसभा मतदारसंघात मोठं ट्विस्ट; बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश?