धाराशिवच्या कलाकेंद्रात दोघांना फरशीने मारहाण, खरा कांड वेगळाच, समोर आली मोठी अपडेट
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Dharashiv: सोमवारी सायंकाळी उशिरा धाराशिव जिल्ह्याच्या येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका कलाकेंद्रात दोन जणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव: सोमवारी सायंकाळी उशिरा धाराशिव जिल्ह्याच्या येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका कलाकेंद्रात दोन जणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ८ ते १० लोकांनी दगड आणि फरशीने मारहाण केली. या हाणामारीत एकजण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कलाकेंद्रात झालेल्या हाणामारीला आता वेगळं वळण मिळताना दिसत आहे.
धाराशिवच्या महाकाली कला केंद्रावर झालेल्या राड्यात फक्त हाणामारीच झाली नाही. तर गोळीबार झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. मात्र कलाकेंद्रात गोळीबार झाला नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे कलाकेंद्रात नेमकं काय घडलं? दोघांना मारहाण कशामुळे झाली? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, महाकाली कलाकेंद्रात झालेली मारहाण ही जुन्या भांडणाच्या कारणातून झाल्याचं म्हटलं आहे. आरोपी अक्षय साळुंखे, राज पवार, विजय साळुंखे यांनी संदीप गुट्टे याला दगड, फरशी आणि लाकडाने मारहाण केली. या मारहाणीत संदीप गुट्टे गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी येरमाळा पोलिसांनी तीन आरोपीवर जीवे मारण्याचा प्रयत्नाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. गोळीबार करणारा संशयित आरोपी अक्षय साळुंखे हा सोलापूर जिल्ह्यातून तडीपार असल्याची माहिती आहे.
advertisement
दुसरीकडे, ही घटना गोळीबारातूनच घडली, असा नातेवाईकांचा आरोप आहे. मात्र पोलीस यावर प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. त्यामुळे घटनेमागे नेमकं गौडबंगाल काय आहे? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. जखमी संदीप गुट्टे याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचारस सुरू आहेत. येरमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Osmanabad,Maharashtra
First Published :
August 05, 2025 11:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
धाराशिवच्या कलाकेंद्रात दोघांना फरशीने मारहाण, खरा कांड वेगळाच, समोर आली मोठी अपडेट


