Dharashiv News : धाराशिव नामांतराबाबत महत्त्वाची बातमी; मोठ्या निर्णयाची शक्यता!
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
दोन वर्षांपूर्वी उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतरण करण्यात आले आहे.
धाराशिव, बालाजी निरफळ, प्रतिनिधी : उस्मनाबादचं धाराशिव नामांतराबाबत मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिवच्या नामांतराचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्य शासनाच्या निर्णयात हस्तक्षेप न करण्याचा उच्च न्यायालयाच्या निर्णायानंतर आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढील दोन आठवड्यात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
धाराशिव नामांतराचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे, राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतरण केले या नामंतराला उस्मानाबाद नामांतरण कृती समितीने विरोध दर्शवला होता. समितीच्या वतीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास मनाई करत हे प्रकरण निकाली काढले होते, मात्र उच्च न्यायालयाच्या निकालावर समाधान न झाल्याने आता या कृती समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुढील दोन आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी होणार असून, सर्वोच्च न्यायालय आता यावर काय निर्णय घेणारं हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्यात आलं आहे. या नामतंरावर अनेकांनी अक्षेप घेतला आहे. उस्मानाबाद नामांतरण कृती समितीच्या वतीनं या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
July 11, 2024 7:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv News : धाराशिव नामांतराबाबत महत्त्वाची बातमी; मोठ्या निर्णयाची शक्यता!