Dharashiv News : रामलिंग मंदिर परिसरातील 9 माकडांच्या मृत्यूचं गूढ उकललं; तपासात धक्कादायक माहिती समोर

Last Updated:

धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध येडशी रामलिंगघाट अभयारण्यात एकापाठोपाठ नऊ मकडांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

News18
News18
धाराशिव, प्रतिनिधी, बालाजी निरफळ :  धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध येडशी रामलिंगघाट अभयारण्यातील रामलिंग मंदिर परिसरातील एकापाठोपाठ नऊ माकडांचा मृत्यू  झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. माकडांना उष्णतेमुळे त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष सुरुवातीला काढण्यात आला होता. मात्र आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. अज्ञात व्यक्तीनं अन्नातून विष देऊन नऊ माकडांचा जीव घेतल्याची नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात येडशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध येडशी रामलिंगघाट अभयारण्यातील रामलिंग मंदिर परिसरातील माकडांना अन्नातून विष देऊन मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  विषबाधा झाल्यानेच माकडांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष वनविभागाने काढला आहे. याप्रकरणी आता अनोळखी व्यक्तींच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त इतर कोणत्या आजाराचा संसर्ग या माकडांना होता का याची देखील तपासणी करण्यात येणार असून, पैठण येथील सहाय्यक वनसंरक्षकांच्या मार्गदर्शनात घटनास्थळाची  परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न वन्यविभाग करत आहे.
advertisement
मागील आठवड्यात या ठिकाणी तब्बल 9 माकडांचा मृत्यू झाला होता. अचानक येथील माकडे आजारी पडू लागल्याने पशुसंवर्धनच्या सहाय्यक आयुक्तांनी शवविच्छेदन करून मृत पावलेल्या माकडांचा व्हिसेरा तपासणीकरिता वनपरिक्षेत्र कर्मचाऱ्यांकडे पाठवला. या व्हिसेराच्या आधारे अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आता अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, कोणत्या कारणामुळे ही माकडे मारली, कोणी मारली याचा शोध घेण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv News : रामलिंग मंदिर परिसरातील 9 माकडांच्या मृत्यूचं गूढ उकललं; तपासात धक्कादायक माहिती समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement