Dharashiv : वीज पडल्यानंतर पाण्याचा बदलला रंग? निळे पाणी वाहू लागल्याने गावकरीही चकीत
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
एका शेतात वीज पडल्यानंतर जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी निघाल्याचं समोर आलं होतं. यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आणि भीतीही निर्माण झाली होती.
बालाजी निरफळ, धाराशीव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला येथे एका शेतात वीज पडल्यानंतर जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी निघाल्याचं समोर आलं होतं. यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आणि भीतीही निर्माण झाली होती. या प्रकारानंतर प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावचे तलाठी आणि डिपार्टमेंटचे अधिकारी यांनी भेट दिली. वीज जिथे पडली तिथे पाणी कशामुळे निळ्या रंगाचे येत आहे याचा तपास घेण्यात आल्यानंतर वेगळीच माहिती समोर आलीय.
भूवैज्ञानिक व महसूल प्रशासनाने या प्रकरणाचा शोध घेतला. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तिथे तपास केला गेला. यात वीज पडली त्याच्या काही अंतरावर कचऱ्याची ढीग होते. त्यात निळ्या रंगाचे डबे होते आणि याच कलरच्या डब्यातील कलर पाण्यात मिसळला जात होता. पावसाच्या पाण्याने हा कलर मिसळला जात असल्याचे लक्षात आले नव्हते.
दरम्यान, पाणी कशामुळे निळे झाले हे गावकऱ्यांना समजले नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांनी भूगर्भातून निळे पाणी येत असल्याचे व्हिडिओ सोशल माध्यमावर प्रसारित केले. त्यातूनच या निळ्या पाण्याबाबत रहस्य वाढले होते. आता प्रशासनाने केलेल्या तपासणीनंतर हे पाणी भूगर्भातून येत नसून ते पाणी कचऱ्या खालील निळ्या कलरच्या डब्बे मिक्स झाल्यामुळे येत असल्याचं स्पष्ट केलं आहे. गावकऱ्यांनी व इतर लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 11, 2024 10:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Dharashiv : वीज पडल्यानंतर पाण्याचा बदलला रंग? निळे पाणी वाहू लागल्याने गावकरीही चकीत