'तुला कापू का?' गळ्यावर कोयता लावून विकृताची डॉक्टरला धमकी, थरकाप उडवणारा CCTV VIDEO
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Dharashiv Crime: धाराशिव शहरातील सिव्हील रुग्णालय परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका विकृताने शिकाऊ डॉक्टरच्या गळ्याला कोयता लावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव : धाराशिव शहरातील सिव्हील रुग्णालय परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका विकृताने शिकाऊ डॉक्टरच्या गळ्याला कोयता लावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तुझा गळा कापू का? असं विकृताने म्हटलं. तसेच बराच वेळ आरोपी डॉक्टरच्या कॉलरला पकडून धमकावत होता. हा सगळा प्रकार रुग्णालय परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
ही घटना धाराशिव शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरात घडली. इथं एका शिकाऊ डॉक्टरच्या गळ्यावर कोयता ठेवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी तरुण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवत होते. यावेळी एका आरोपीनं कोयत्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर घाव घातले. त्याने पेट्रोलची टाकी फोडण्याचा प्रयत्न केला.
advertisement
याच वेळी घटनास्थळावरून २६ वर्षीय शिकाऊ डॉक्टर हिमांशु व्यास जात होते. ते मूळचे राजस्थानचे असून या रुग्णालयात इंटर्नशिप करत होते. दरम्यान, हिंमाशूला पाहून आरोपी त्याच्या दिशेनं आला. त्याने हिंमाशूच्या गळ्याला कोयता लावून 'तुला कापू का?' म्हणत धमकी दिली. यानंतर त्याने हिंमाशूची कॉलर पकडून काही वेळ धमकावत राहिला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
advertisement
धाराशिव: 'तुला कापू का?' म्हणत गळ्यावर कोयता लावला, विकृताची डॉक्टरला धमकी pic.twitter.com/Uo76UKj6DY
— News18Lokmat (@News18lokmat) August 4, 2025
आरोपीनं अशाप्रकारे हिंमाशूच्या गळ्यावर कोयता का लावला? धमकी का दिली? याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी आरोपी स्वप्नील राऊतसह त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
view commentsLocation :
Osmanabad,Maharashtra
First Published :
August 04, 2025 9:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
'तुला कापू का?' गळ्यावर कोयता लावून विकृताची डॉक्टरला धमकी, थरकाप उडवणारा CCTV VIDEO


