जिल्हा परिषदेची ही शाळा म्हणजे एकच नंबर, उपक्रमांची सरकारनेही घेतली दखल!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
हिरवळीने नटलेला परिसर, कोरीव दर्जेदार बांधकाम आकर्षक, रंगसंगतीत बोलक्या झालेल्या भिंती. त्यावर रेखाटलेलं बहुविधज्ञान, बागेतल्या ताज्या भाजीपाल्याचा पोषण आहारात वापर, एखाद्या स्टार हॉटेलात असतं तसं हँडवॉश स्टेशन, वर्गाच्या चार भिंतीच्या आत डिजिटल शिक्षण, अशी व्यवस्था या मराठी शाळेत आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : सध्या अनेकदा जिल्हा परिषदेच्या म्हणजे मराठी शाळांबाबत तक्रार केली जाते. तिथली परिस्थिती, शिक्षकांची कमतरता आणि इतर व्यवस्था तसेच शिक्षणाचा दर्जा याबाबत पालकांमध्ये एक निराशा दिसून येते. पण आज आम्ही तुम्हाला जिल्हा परिषदेच्याच एका अशा शाळेची गोष्ट सांगणार आहोत, ज्या शाळेची आज सर्वत्र चर्चा होत आहे.
हिरवळीने नटलेला परिसर, कोरीव दर्जेदार बांधकाम आकर्षक, रंगसंगतीत बोलक्या झालेल्या भिंती. त्यावर रेखाटलेलं बहुविधज्ञान, बागेतल्या ताज्या भाजीपाल्याचा पोषण आहारात वापर, एखाद्या स्टार हॉटेलात असतं तसं हँडवॉश स्टेशन, वर्गाच्या चार भिंतीच्या आत डिजिटल शिक्षण, अशी व्यवस्था या मराठी शाळेत आहे. आता तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की ही शाळा नेमकी आहे तरी कुठे. तर ही शाळा म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील भाटशिरपूरा येथील जिल्हा परिषद शाळा.
advertisement
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानात लातूर शिक्षण विभागात ही शाळा प्रथम आली आहे. तसेच या शाळेचा 21 लाख रुपये व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला आहे. शाळेच्या परिसरात 650 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विविध उपक्रम राबवले जात आहेत.
advertisement
अशी आहे ही सुसज्ज शाळा -
- दत्तक पालक योजना, माझे बी माझे झाड, प्रत्येक वर्गात टीव्ही द्वारे अध्यापन, सीसीटीव्हीच्या निगराणीखाली शाळा आणि बालभारतीचे थेट प्रक्षेपण, असे एक ना अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात.
- हायटेक ई लर्निंग, सुसज्ज ग्रंथालय, ग्रंथालयात तब्बल अडीच हजारांहून अधिकची पुस्तके आहेत.
- खेळासाठी मैदान आणि तितकीच दर्जेदार गुणवत्ता, यामुळे शाळेला अनेक पुरस्कार मिळाले.
advertisement
- मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हा विभागातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार, पंचायत समितीचा तालुकास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार, धनेश्वरी शिक्षण मंडळाचा उपक्रमशील शाळा पुरस्कार असे अनेक पुरस्कार या शाळेला मिळाले आहेत.
advertisement
- गावकरी व शिक्षकांनी 11 लाख रुपयांचा रक्कम जमा करत शाळेसाठी सुविधा पुरवल्या आहेत. त्यामुळे आज भाटशिरपुराची शाळा विविध उपक्रमांनी आणि दर्जेदार शिक्षण आणि सुविधांनी युक्त शाळा म्हणून ओळखली जात आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Jul 02, 2024 2:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
जिल्हा परिषदेची ही शाळा म्हणजे एकच नंबर, उपक्रमांची सरकारनेही घेतली दखल!







