advertisement

मकर संक्रांतीसाठी खण कसे तयार केले जातात? पाहा कुंभार वाड्यातील Making Video

Last Updated:

मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कुंभार वाड्यात खण तयार करण्याची लगबग सुरू झालीय.

+
News18

News18

धाराशिव, 25 डिसेंबर: मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कुंभार वाड्यात छोटे छोटे खण तयार करण्याची लगबग सुरू झालीय. मकर संक्रातीच्या काळात खणांना मोठी मागणी असते. त्यामुळे धाराशिव तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील हनुमंत कुंभार यांच्या घरी देखील संक्रातीचे खण बनवण्याची लगबग सुरू आहे.
कुठून आणतात माती?
हनुमंत कुंभार खण बनवण्यासाठी लागणारी माती पंढरपूरहुन आणतात. या मातीचे एक टिपर 30 हजार रुपयाला मिळते, तर तांबड्या मातीचे टिपर दहा हजार रुपयांना मिळते. खण बनवण्यसाठी कारखान्यावरून भुसा देखील विकत आणावा लागतो. त्यामुळे खण बनवण्यासाठीचे साहित्य खरेदीसाठी जवळपास 70 ते 80 हजार रुपयांचा खर्च येतो. संक्रात आणी वेळ अमावश्या या दोन सणांचे त्यांना एक ते दिड लाख रुपयांचे उत्पन्न होते, तर वेळ अमावस्या चे 50 हजार रुपयांचे उत्पन्न होते. याचं बरोब्बर उन्हाळ्यात माठ विक्रीतून एक लाख रुपये मिळतात वर्षाकाठी अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न होते, असं हनुमंत कुंभार सांगतात.
advertisement
कसे बनवतात खण?
पारंपरिक व्यवसायात खण बनवण्यासाठी मी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केलाय. इलेक्ट्रॉनिक चाक खरेदी केले आहेत. चिखल तुडवण्याचे मशीनही ‌खरेदी केले आहे . त्यामुळे कष्टात बचत झाली आहे. खण बनवण्यासाठी माती चाळून पाण्यात भिजवली जाते, त्यानंतर ती माती तुडवून एका चाकावर तुडवलेल्या चिखलाच्या गोळ्याला आकार दिला जातो आणि खण बनवले जातात. संक्रांतीच्या सणासाठी, खण, झाकण्या बनवल्या जातात, तर उन्हाळ्यात माठ बनवले जातात आणि धाराशिव शहरात विक्री केली जाते, असंही हनुमंत कुंभार यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
मकर संक्रांतीसाठी खण कसे तयार केले जातात? पाहा कुंभार वाड्यातील Making Video
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement