Maharashtra Politics : अजितदादांनी टाकला मोठा डाव, अखेर तो बडा नेता आज करणार राष्ट्रवादीत प्रवेश, इथून मिळणार उमेदवारी

Last Updated:

Maharashtra Politics : मोठी बातमी समोर येत आहे. आज बड्या नेत्याचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे. लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election 2024) बिगूल वाजलं आहे. महायुतीकडून अनेक जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अद्यापही काही जागांचा तिढा न सुटल्यानं उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाहीये.

बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत आज प्रवेश होणार
बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत आज प्रवेश होणार
धाराशिव, बालाजी निरफळ, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election 2024) बिगूल वाजलं आहे. महायुतीकडून अनेक जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अद्यापही काही जागांचा तिढा न सुटल्यानं उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाहीये. या जागेमध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश होतो. मात्र आता धाराशिवचा तिढा सुटल्यात जमा आहे. ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली आहे. भाजपचे आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या वतीनं उमेदवारी देण्यात येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अर्चना पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू होती. मात्र अर्चना पाटील यांच्या पक्षप्रवेशाला महायुतीमधूनच काही जणांचा विरोध होता. त्यामुळे हा पक्षप्रवेश रखडला होता. अखेर आज अर्चना पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला मुहूर्त मिळाला आहे. आज दुपारी अर्चना पाटील या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. अर्चना पाटील या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घड्याळ या चिन्हावर धाराशिवची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
दरम्यान राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास धाराशिवमध्ये दीर आणि भावजईमध्ये हाय होल्टेज लढत होण्याची शक्यता आहे, धाराशिवची जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेली असून, शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात अर्चना पाटील विरोधात ओमराजे निंबाळकर अशी लढत होण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
Maharashtra Politics : अजितदादांनी टाकला मोठा डाव, अखेर तो बडा नेता आज करणार राष्ट्रवादीत प्रवेश, इथून मिळणार उमेदवारी
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement